भद्रावती हत्या प्रकरण, मैत्रिणीनेच केला घात, वारंवार होणारा अपमान सहन न झाल्यामुळे मैत्रिणीने एका मित्राच्या माध्यमातून केली हत्या
चंद्रपूर :- आठवड्यापूर्वी भद्रावती शहराच्या लगत ओसाड जागी या युवतीचे शीर कापलेले शव आढळले होते. या निर्घृण हत्येने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्याच शीर बेपत्ता असलेल्या विवस्त्र अवस्थेतील युवतीच्या शवाचे कोडे अखेर उलगडले आहे. एकाच रूममध्ये वास्तव्याला असलेल्या दोन मैत्रिणींमधील असूयेतून ही हत्या झाल्याचा दावा चंद्रपूर पोलिसांनी केला आहे. घटनास्थळी कुठलाच पुरावा अथवा युवतीची ओळख पटविणारी बाब आढळून आली नाही. त्यामुळे तपास यंत्रणा दीर्घकाळ प्रयत्नशील होत्या. पोलिसांची सायबर शाखा यासाठी अहोरात्र काम करत होती. त्यातून मुलगी नागपूरजवळ रामटेक येथील रहिवासी असून, कुटुंबापासून वेगळी राहत असल्याने तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार नव्हती. घटनेच्या दिवशी आरोपींनी या निर्जन ठिकाणी युवतीला दुचाकीवर घेऊन जात भांडण उकरून काढत धारदार शस्त्राने तिची हत्या केल्याचे उघड झाले. पुरावा मिळू नये, यासाठी तिला विवस्त्र करून डोके धडावेगळे करत सर्व वस्तू मोबाईल देखील नाहीसे केले. पोलिसांनी सायबर शाखेच्या तांत्रिक तपासात पुढे आलेल्या एका अल्पवयीन मुलीला अटक केली गेली. मयत मुलगी या अल्पवयीन मुलीला सतत अपमानित करत होती, अशी माहिती पुढे आली आहे. यातील दुसरा पुरुष आरोपी निष्पन्न झाला असून, हा आरोपी मात्र अद्याप फरार आहे. मयत मुलीचे शीर अद्याप गवसले नसल्याने पोलिस तपास अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. या हत्या प्रकरणाचे अनेक कंगोरे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, पोलीस महत्वाचे दुवे जोडून काढत पुढील तपास अरविंद साळवे पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि संदीप काकडे पोउनी अतुल कावळे, राजेंद्र खनके, नाईम खान, व इतर पोलीस कर्मचारी नी तपास कार्यात मदत केली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या