भारतीय जनता पार्टी बल्लारपूर द्वारे राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्वरित बोनस घोषित करण्याची तीव्र मागणी मा.तहसीलदार बल्लारपूर द्वारे राज्य सरकार ला मागणीचे निवेदन सादर

Vidyanshnewslive
By -
0

भारतीय जनता पार्टी बल्लारपूर द्वारे राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्वरित बोनस घोषित करण्याची तीव्र मागणी

मा.तहसीलदार बल्लारपूर द्वारे राज्य सरकार ला मागणीचे निवेदन सादर

बल्लारपूर :- राज्‍य शासनाने यावर्षी धान उत्‍पादक शेतकऱ्यांसाठी अद्यापही बोनस घोषीत केलेला नाही. त्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या धान उत्‍पादक जिल्ह्यांमधील शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. करीता, धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर बोनस जाहीर करण्यात यावा, ही मागणी घेऊन शुक्रवार, दि. २५ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ठीक ५:०० वाजता नगरपरिषद चौक बल्लारपूर येथे मा.श्री चंदन सिंह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात व मा.श्री हरीश शर्मा माजी नगराध्यक्ष न.प बल्लारपूर  यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा.श्री काशीनाथ सिंह भाजप शहर अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेत आंदोलन करण्यात आला आणि त्या नंतर मा. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी प्रमुख्याने मा.श्री.हरीश शर्मा जी(माजी नगराध्यक्ष न.प बल्लारपूर), मा.श्री.काशीनाथ सिंह जी(भाजप शहर अध्यक्ष), वरिष्ठ नेता मा.श्री. शिवचंद द्विवेदी जी, श्री. मनीष पांडे जी(महामंत्री,भाजपा,बल्लारपुर) श्री.आशीष देवतळे जी(जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा)श्री.राजू दारी जी(जिल्हा अध्यक्ष ट्रांसपोर्ट आघाडी),श्री.जुम्मन रिज़वी जी( जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्यक आघाडी),श्री.रनंजय सिंह जी(अध्यक्ष युवा मोर्चा,बल्लारपुर), सौ.वैशाली जोशी जी(अध्यक्ष महिला आघाडी), माजी नगर सेविका सौ.सारिका कनकम जी,सौ.जयश्री मोहुर्ले जी, सौ.सुवर्ना भटारकर जी, श्री.सतीश कनकम जी, श्री.मोहित डंगोरे जी, श्री देवेंद्र वाटकर जी,श्री.किशोर मोहुर्ले जी, श्री.घनश्याम बुरडकर श्री.संजय बाजपेयी, श्री.श्रीनिवास कंदुकुरी जी, श्री.आशीष चावड़ा जी,श्री.विशाल शर्मा जी श्री.श्रीकांत पेरका इत्यादि असंख्य मा.भाजपा नेता, नगरसेवक/नगरसेविका, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)