चंद्रपुरातील आजाद बाग बनलीय राजकीय आखाडा मान-अपमानाचा सावटाखाली होतेय आजाद बागेचे लोकार्पण
ऐनवेळी मनपाने बदलली निमंत्रण पत्रिका लोकप्रतिनिधी, आमदार-खासदारांच्या नावाचा समावेश
चंद्रपूर :- राज्यातील सर्वात उष्ण शहर तसेच विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून ओळख असलेलं चंद्रपूर शहर सर्वदूर परिचित आहे दिवसेंदिवस वाढत असलेलं प्रदूषण चिंताजनक स्थिती निर्माण करत आहे अशा वेळी नागरिकांना आपला त्रास कमी व्हावा या दृष्टीने चंद्रपुरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली आजाद बाग ही एकमेव अशी बाग होती ज्यात नागरिक आपला थकवा दूर करण्यासाठी यायचे मात्र त्याच आजाद बागेचे आधुनिकीकरण करणं करण्यासाठी सुमारे ६ वर्षांपूर्वी सुरुवात झाली मात्र आज त्याच आजाद बागेचे २६ मार्चला लोकार्पण होत असताना स्थानिक आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी नी नावे नाहीत तसेच राजशिष्टाचाराचा भंग झाला या चंद्रपूर मनपावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली तसेच जिल्हा प्रशासनाने ही कार्यवाही करण्याची भूमिका मांडली होती त्यातच चंद्रपुरातील स्थानिक आमदारांनी " मै झुकेगा नही, होय मी येणारच आहे " अशा प्रकारचे बैंनर लक्ष वेधत आहेत याला अनुसरून चंद्रपूर मनपाने आपली चूक दुरुस्त करून काही प्रमाणात राजकीय वादंग टाळले असल्याची माहिती राजकीय जाणकार देत आहे.
सूत्राच्या माहितीनुसार चंद्रपूर मनपाने मौलाना अबुल कलाम आझाद बागेच्या लोकपर्ण सोहळ्यात उदघाटक म्हणून माजी वित्तमंत्री आ. सुधिरभाऊ मुनगंटीवार, अध्यक्ष म्हणून आ. विजय वडेट्टीवार, बहुजन कल्याण मंत्री व पालकमंत्री, चंद्रपूर, विशेष उपस्थिती म्हणून खा.बाळूभाऊ धानोरकर, आ.प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री(म.रा), महापौर राखी कंचरलावार, तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. किशोर जोरगेवार, आ. रामदास आंबटकर, आ. नागो गाणार, आ. सुभाष धोटे, आ. सौ.प्रतिभा धानोरकर, आ. अभिजीत वंजारी, आ. किर्तीकुमार भांगडिया, श्री.अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी चंद्रपूर ई उपस्थिती असणार आहे. विशेष म्हणजे ऐनवेळी लोकप्रतिनिधींचे नाव टाकल्यामुळे सर्वांना व्हाट्सएप द्वारे निमंत्रण पत्रिका पाठविण्यात येत आहे अशी माहिती सूत्राकडून प्राप्त होत आहे. तरी मी जनसामान्य नागरिक असून नागरिकांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढत राहील त्यामुळं मी लोकार्पण सोहळ्याला नक्की जाईल अशी भूमिका चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068



टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या