प्रा. डॉ. किशोर चौरे यांच्या संशोधनास डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पीएच. डी. पुरस्कार

Vidyanshnewslive
By -
0

 प्रा. डॉ. किशोर चौरे यांच्या संशोधनास डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पीएच. डी. पुरस्कार जाहीर : २७ मार्च रोजी नागपुरात प्रदान करण्यात येईल.

बल्लारपूर : बल्लारपूर येथील महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. किशोर शेषराव चौरे यांना जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पीएच.डी. पुरस्कार जाहीर झाला. याबाबत मंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे, कार्याध्यक्ष डॉ. गोविंदराव कांबळे, कार्यवाहक डॉ. रवींद्र तिरपुडे, सरचिटणीस सुजीत मुरमाडे यांच्या स्वाक्षरितील पत्राद्वारे कळविण्यात आले. त्यांच्या संशोधनाचा विषय " महाराष्ट्रातील दलित व बहुजनांच्या उत्थानासाठी केलेले मा. कांशीराम यांचे कार्य - एक ऐतिहासिक अध्ययन" हा होता. दि.२७ मार्च रोजी हा पुरस्कार दीक्षाभूमी नागपूर येथील आडीटोरियम सभागृहात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सदरील पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक व मित्रपरिवारांनी अभिनंदन केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)