वेकोलीच्या बल्लारपूर एरियातील सास्ती(धोपटाला) टॉऊनशिप मध्ये गॅसचेंबर साफ करतांना अपघात ५ कामगार जखमी असल्याचे वृत्त, ३ कामगार गंभीर असल्याची माहिती, चंद्रपुरात उपचार सुरू
बल्लारपूर :- वेकोलीच्या बल्लारपूर एरिया अंतर्गत येणाऱ्या सास्ती(धोपटाला) टॉऊन शिप मध्ये आज सकाळी १०:१५ वाजताच्या दरम्यान वेकोलीचे २ कामगार व ३ कंत्राटी कामगार असे एकूण ५ कामगार गैस चेंबर ची सफाई करतांना बेशुद्ध झाले असल्याची माहिती आहे या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी १०:१५ वाजताच्या दरम्यान गॅस चेंबर ची सफाई करण्यासाठी २ कंत्राटी कामगार उतरले असता गॅस लागल्यामुळे घटनास्थळीच बेशुध्द झाले याची माहिती बाहेर असलेल्या कामगारांना माहिती पळताच ते बचाव कार्यात मदतीसाठी २ वेकोली कामगार व १ कंत्राटी कामगार गेले असता त्यांना ही अस्वस्थ वाटू लागले लागलीच या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याना मिळतात घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्यास सुरुवात केली विशेष म्हणजे या ५ ही कामगारांना सर्वप्रथम वेकोलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात येऊन प्राथमिक उपचार करण्यात आले मात्र परिस्थिती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारार्थ वेकोलीच्या चंद्रपूर एरिया हॉस्पिटल व जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले सूत्राच्या माहिती नुसार या पैकी ३ कामगार गंभीर स्थितीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे आज सकाळी च्या पाळीत कामावर रुजू झालेले श्री.शंकर अंदगुला, सुभाष खांडारकर, सुशील कोरडे(वेकोली कामगार), प्रमोद वाभीटकर(वेकोली कामगार), राजू जर्जला, अशी त्या कामगारांची नावे असून यांचेवर चंद्रपुरात उपचार सुरू आहेत मात्र यावेळी वेकोली मध्ये काम करणाऱ्या कामगारांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे कार्यावर जाताना कामगारांना सुरक्षा प्रतिबंधक किट नेली की नाही हा ही प्रश्न निर्माण झाला आहे मात्र घडलेल्या या घटनेमुळे दोषी असलेल्या वर कार्यवाही करण्याची मागणी वेकोली कामगार बांधवाकडून करण्यात आली आहे. या घटनेची माहिती कळताच राजुरा येथील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास सुरू आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या