Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

बल्लारपूरात रस्ता अपघात ट्रकने मागून धडक दिल्याने एकाचा मृत्यू : काटा गेट परिसरातील टर्निंग वरील घटना, मृतक विसापूर निवासी

बल्लारपूरात रस्ता अपघात ट्रकने मागून धडक दिल्याने एकाचा मृत्यू : काटा गेट परिसरातील टर्निंग वरील घटना, मृतक विसापूर निवासी

बल्लारपूर :- आज सकाळी आठ वाजता चा दरम्यान काटा गेट समोरील मोडीवर एका ट्रक ने स्कुटी स्वार मृतक कुणाल गजानन डबरे (३६) याला मागून जोरदार धडक दिल्याने ट्रक चा मागचा चाकात मृतक चा डोक्यावरून चाक गेल्याने जाग्यावरच मृत्यू झाला.विसापूर रेल्वे गेट जवळ राहणाऱ्या गजानन डबरे व मुलगा कुणाल डबरे दोघेही रेलवे स्टेशन ला आपल्या मुलाला पोहचविण्यासाठी घरून निघाले बल्लारपूर येथील काटा गेट समोरील मोडीवर वाघमारे किराणा समोर सचिन जैन लिहलेल्या ट्रक क्र, MH-34-AV-0994 या ट्रक ने स्कुटी ला मागून धडक दिल्याने बाप - मुलगा रोड चा दोन्ही बाजूंनी पडले त्यात मुलगा कुणाल चा डोक्यावरून ट्रक चा मागील चाक गेल्यामूळ संपूर्ण मस्तिष्क बाहेर निघाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. एका बापा समोरच मुलाचा मृत्यू झाल्याने बापावर तर वीजच कोसळली, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले व मृतक ला शवविच्छेदना करिता ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले.पोलिसांनी ट्रक व ट्रक ड्राइवर ला ताब्यात घेतले आहे, चंद्रपूर वरून बल्लारपूर कडे येत असताना नेहमीच काटा गेट मोडीवर अपघात होतात इथे बल्लारपूर पेपर मिल मध्ये जाणाऱ्या ट्रक नेहमी या परिसरात तसेच राज्य महामार्गावर उभे असतात या कारणाने सुद्धा या ठिकाणी अपघात होतात.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या