महात्मा फुले महाविद्यालय व गुरूनानक विज्ञान महाविद्यालय, बल्लारपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत “सामाजिक समता सप्ताह” साजरा (A "Social Equality Week" will be celebrated at Mahatma Phule College and Guru Nanak Science College, Ballarpur, from April 8 to April 14, 2026, on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti.)

Vidyanshnewslive
By -
0
महात्मा फुले महाविद्यालय व गुरूनानक विज्ञान महाविद्यालय, बल्लारपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत “सामाजिक समता सप्ताह” साजरा (A "Social Equality Week" will be celebrated at Mahatma Phule College and Guru Nanak Science College, Ballarpur, from April 8 to April 14, 2026, on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti.)



बल्लारपूर :- "गुलामाला गुलामगिरीची आठवण करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल " तसेच " शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे याला जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. " या उक्ती प्रमाणे महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या विविध पैलूवर मार्गदर्शन करण्यात आले ज्यात सामाजिक विचार, आर्थिक विचार, राजकीय विचार तर सांगण्यात आले यासोबतच भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वाना एकसूत्रात कायद्याच्या चौकटीत बांधण्याचं मोठं कार्य केले. विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर प्रबोधनात्मक मार्गदर्शन पर कार्यक्रम पार पडला यावेळी विचार मंचावर डॉ. रजत मंडल, (प्रभारी प्राचार्य), डॉ. किशोर चौरे, डॉ. स्वप्नील बोबडे, डॉ. पल्लवी जुनघरे कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. विनय कवाडे सह कार्यक्रम अधिकारी रासेयो, प्रकाश मेश्राम, वरिष्ठ लिपिक, सिद्धार्थ मोरे यांची उपस्थिती होती मान्यवरांचे मार्गदर्शन पार पडले या कार्यक्रमाला डॉ. रोशन फुलकर, डॉ. बादलशाह चव्हाण, डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. पंकज कावरे, डॉ. सतिश कर्नासे प्रा. शुभांगी भेंडे, प्रा ललित गेडाम, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, शामराव दरेकर, सागर दौरेवार, यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. 


         गुरूनानक विज्ञान महाविद्यालय, बल्लारपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. बहिरवार सर होते.
यावेळी विचारपीठावर आयक्यूएसी समन्वयक डॉ. शोभा गायकवाड मॅडम, मान्यवर अतिथी डॉ. प्रफुल्ल
काटकर सर, रासेयो सह कार्यक्रम अधिकारी डॉ. मनीषा जिवतोडे मॅडम तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गौरव घुगरे सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्राचार्य व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व, सामाजिक समतेसाठी त्यांनी केलेले कार्य आणि भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांचे योगदान यावर प्रकाश टाकला. महाविद्यालयात ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत “सामाजिक समता सप्ताह” साजरा करण्यात आला. या अंतर्गत ९ एप्रिल रोजी संत गाडगे बाबा यांच्यावर भाषण कार्यक्रम, ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त विविध कार्यक्रम तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच १३ एप्रिल रोजी भाषण स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन NSS विभागाच्या वतीने करण्यात आले असून शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)