१४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त सुप्रीम कोर्ट आणि त्याची रजिस्ट्री बंद राहील..!
नवी दिल्ली :- सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने ९ एप्रिल २०२६ रोजी अधिकृत सर्क्युलर काढले आहे, ज्यात स्पष्टपणे सांगितले आहे की मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ.बी.आर.आंबेडकर (बाबासाहेब) यांच्या जन्मदिनानिमित्त सुप्रीम कोर्ट आणि त्याची रजिस्ट्री बंद राहील ९ एप्रिल २०२६ रोजी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने F.No.22/Cal/2025-26/SCA(G) नंबरचा सर्क्युलर काढला. त्यात स्पष्टपणे लिहिले आहे. “Hon’ble Chief Justice of India has directed that the Supreme Court of India and its Registry shall remain closed on Tuesday, the 14th April, 2026 on account of the birthday of Dr. B.R. Ambedkar." ज्या कोर्टात कायदे बनतात, ज्या कोर्टात संविधानाचे रक्षण होते,त्या कोर्टाने स्वतःच जाहीर केले, कि बाबासाहेबांचा जन्मदिन हा राष्ट्रीय सन्मानाचा दिवस आहे..!
आता सांगा की भिमजयंती आली कि तुम्हाला लय पोटशूल उठतो तुमचं ठणकत ना बाबासाहेबांनी काय केलं घ्या आता...सुप्रीम कोर्टाने त्यांच्या कार्याला सलामी दिली..! या लोकांनी वर्षानुवर्षे बाबासाहेबांना “फक्त दलितांचा नेते” म्हणून हेटाळले, संविधान निर्माते नाहीत मध्येच कोणतं तरी संविधान निर्माता उभा केला, ज्यांनी त्यांच्या संविधान कर्तृत्वाला “कॉपी-पेस्ट” म्हणून टिंगल केली, ज्यांनी “आंबेडकराने काय केले?” असा प्रश्न विचारून विटंबना केली, त्यांचं तोंड सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयातून नक्कीच बंद झालं असेल..! आरे भावा निर्मात्यालाच सलाम करतात आयरे गयऱ्यांना नाही. कितीही भुका, बाप हा शेवटी बापच असतो, बापाचा रुबाब त्यांचा दरारा काल ही होता आजही आहे आणि उद्या ही असणार आहे..! बाबासाहेबांचे कर्तृत्व इतके भव्य दिव्य आहे की, त्यांना रोखण्यासाठी संपूर्ण यंत्रणेला सुप्रीम कोर्टापर्यंत यावे लागले. तरी पण त्यांच्या कार्य कर्तुत्वाला तुम्ही रोखू शकणार नाही... बाबासाहेबांचे ते कर्तृत्व जे कधीही कुणालाही झाकता येणार नाही, कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी..तो प्रज्ञासूर्य आहे उगवायचा थांबणार नाही..!
संविधानाचे शिल्पकार २९९ सदस्यांच्या संविधान सभेत एकट्या आमच्या बापानं बाबासाहेबांनी ९०% काम केले. आज जो कायदा तुम्ही लोक “हिंदू राष्ट्र” म्हणून बदलण्याची स्वप्ने पाहता, तोच कायदा बाबासाहेबांनी लिहिला आहे. समानता, स्वातंत्र्य, बंधुभाव.. जातीव्यवस्थेवर सर्वात मोठा प्रहार हा १९२७ साली महाड सत्याग्रह, १९३० साली नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह, पूना पैक्ट... एकट्या बाबासाहेबांनी ज्या जातीव्यवस्थेला हजारो वर्षे टिकवले होते त्या प्रथेला अनेक हादरे दिले..! शिक्षण क्रांती “शिका संघटित व्हा, संघर्ष करा” हा मंत्र फक्त दलितांसाठी नव्हता,तो संपूर्ण भारतासाठी होता.आज लाखो तरुण-तरुणी डॉक्टर, इंजिनियर, न्यायाधीश बनले ते बाबासाहेबांच्या शाळा-हॉस्टल-शिक्षण धोरणामुळे त्यांनी निर्माण केलेल्या महाविद्यालयांमुळे.. या भारतातील महिलांना समान हक्क कोणी हिंदू कोड बिलमध्ये महिलांना संपत्तीचा, घटस्फोटाचा, वारसाहक्काचा अधिकार दिला. जो मनुवादी पुरुषसत्ताकांना अजूनही पचत नाही. पचणी पडलेला दिसतं नाही..!
हिंदू धर्माचा त्याग करून नागपूरच्या त्या नाग भूमीत पूज्य भदंत चंद्रमणी महास्थवीर यांच्या हस्ते बौद्ध धर्म स्वीकारून गुलामीला लाथाडून येथे समता, स्वातंत्र्य प्रस्थापित केलं. १९५६ मध्ये ५ लाख अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारून मनुवादी हिंदू धर्माच्या ब्राह्मणवादी गुलामगिरीतून बाहेर पडले..! ही क्रांती आजही मनुवाद्यांच्या छातीवर दगड आहे. टोचत बोचत आहे रोज,मनुस्मृती जाळून तर मानवतेच्या व्यवस्थेला गुलाम करणाऱ्या मनूला एका क्षणात हद्दपार केलं कायमचं..! सुप्रीम कोर्ट बंद. केंद्रीय सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. बँका,स्टॉक एक्सचेंज, सरकारी कार्यालये सर्व बंद. ज्या लोकांनी बाबासाहेबांना “रिझर्वेशनचा राजा” म्हणून हिणवले, त्यांना आता हे स्पष्ट उत्तर आहे.. भारताचा सर्वोच्च न्यायालय आणि सरकार दोन्ही बाबासाहेबांच्या सन्मानासाठी बंद होतात. तुमच्या “मेरिट” च्या गप्पा आता कुठे आहेत. बाबासाहेब हे केवळ दलितांचे नव्हते, ते भारताच्या समतेचे, न्यायाचे आणि संविधानाचे पिता आहेत.जो कोणी आजही त्यांची विटंबना करेल, त्याला इतिहास आणि भविष्य दोन्ही उत्तर देतील.. १४ एप्रिल २०२६ हा दिवस फक्त सुट्टीचा दिवस नाही. तर स्वाभिमानाचा दिवस आहे. बाबासाहेबांचा सन्मान हा भारताचा सन्मान आहे..!
संकलन :- रविंद्र गायकवाड पुणे
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या