"गुरु नानक विज्ञान महावि‌द्यालय, बल्लारपूर येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन (A two-day international conference was organized at Guru Nanak Science College, Ballarpur.)

Vidyanshnewslive
By -
0
"गुरु नानक विज्ञान महावि‌द्यालय, बल्लारपूर येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन (A two-day international conference was organized at Guru Nanak Science College, Ballarpur.)

बल्लारपूर :- दि. 2 व 3 फेब्रुवारी 2026 ला दोन दिवसीय आंतरवि‌द्याशाखीय राष्ट्रीय परिषद गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित स्थानीय गुरू नानक विज्ञान महावि‌द्यालय बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर, येथे रसायनशास्त्र विभाग व असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स, इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने, "इंनोवेशन इन फिसिकल, कैमिकल आणि बायोलाजीकल सायन्स फॉर सस्टानीबल डेव्हलपमेंट 2026 चे आयोजन नाट्‌यगृह, फंक्शन हॉल, बल्लारपूर येथे केले असून सदर परिषदेकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर परिषदेचे उद्‌द्घाटन गुरु नानक सेवा समिती विरुर/ बल्लारपूर ये सन्मानीय अध्यक्ष श्री. सरदार नागिंदर सिंह सोनी जी साहेब यांचे हस्ते होणार असून, कि-नोट स्पीकर प्रोफेसर वासुदेव गुरनुले, एसीटी उपाध्यक्ष, यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रथम सत्राकरिता डॉ. हेमंत बोरकर, आयआयटी, इंदोर., डॉ. सानिया ए. सि. करबीनेरिओ, पोर्तुगाल आणि जयदीप भट्टाचार्य, गोवा तर दुतीय सत्राकरिता डॉ. संतोष कुमार वर्मा, चीन आणि डॉ. पोनुदुराई रामासामी, मॉरिशस यांचे उत्कृष्ट असे मार्गदर्शन लाभणार आहे. दोन दिवसीय परिषदेत एकूण 6 टेक्निकल सेशन होणार असून, कार्यक्रमाचा शेवट दिनांक 3 तारखेला 3 वाजता होणार आहे. या परिषदेकरिता भारतातील, महाराष्ट्रातील विज्ञान शाखेतील प्राध्यापक, अंशकालीन प्राध्यापक, संशोधक विध्यार्थी यांनी सहभागी होऊन कॉन्फरन्स रजिस्ट्रेशन करावे असे आव्हान परिषद संयोजक डॉ. ज्योत्स्ना खोब्रागडे आणि महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर बहिरवार यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)