बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा फुले महाविद्यालयात 30 जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले तदनंतर 2 मिनिटाचे मौन पाळून गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी विचार मंचावर प्रा. विभावरी नखाते, (सांस्कृतिक विभाग प्रमुख), डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. पंकज कावरे, डॉ. पल्लवी जुनघरे, डॉ. किशोर चौरे, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. रोशन साखरकर, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. दिपक भगत, ई यांच्या सह कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या