राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन, सरकारच्या वतीने तीन दिवसाचा शासकीय दुखवटा, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती (The tragic death of Deputy Chief Minister Ajit Pawar, three days of government mourning on behalf of the government, the Chief Minister gave the information)
मुंबई :- राज्याच्या राजकारणातील प्रभावी राजकीय व्यक्तिमहत्वाने अकाली एक्सिटने सर्वांनाच धक्का दिला आहे. महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. आज त्यांचे विमान अपघातात दुर्देवी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. आज शासकीय सुट्टी दिली आहे. राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं कधीही भरून न येणारी महाराष्ट्राची हानी झाली आहे. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव होते. तळागळातील जनसामनांची जाण असलेला नेता अजित पवारांकडे पाहिले जात होते. आज ते आपल्यात नाहीत. यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये. अजित पवार यांच्या अकाली निधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. माझ्यासाठी दमदार, दिलदार मित्र सोडून गेला आहे. त्यांच्या कुटुंबावर हा प्रचंड मोठा आघात आहे. मी, एकनाथ शिंदे लवकरच बारामतीकडे निघणार आहे. पंतप्रधान, गृहमंत्री यांना फोनवर घटनेची माहिती दिली आहे. त्यांनाही हा धक्का होता. त्यांनी प्रचंड दु:ख व्यक्त केले. पुढच्या सर्व गोष्टी कुटुंबाची चर्चा करून ठरवण्यात येतील असं फडणवीसांनी सांगितले तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझं सुप्रिया सुळे, पार्थ पवारांशी बोलणे झाले. संपूर्ण कुटुंब बारामतीला पोहचल्यानंतर त्यांच्या संमतीने सगळे निर्णय घेतले जातील. आज शासकीय सुट्टी दिली आहे. राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात येत आहे. पुढच्या सर्व बाबींची कल्पना लवकरच देण्यात येईल. या घटनेवर विश्वास ठेवायला मन तयार नाही असे देखील मुख्यमंत्री बोलताना म्हणाले.
राष्ट्रीय किंवा प्रशासकीय दुखवटा हा भारत सरकार किंवा देशातील कोणतंही राज्य सरकार दुखवटा जाहीर करु शकतात. शासकीय दुखवटा हा एक प्रतीकात्मक शोक असतो. देशासाठी किंवा राज्यासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या (राजकारणी, साहित्यिक, वैज्ञानिक, कलाकार इ.) निधनानंतर दु:खाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दुखवटा जाहीर केला जातो. हा दुखवटा संपूर्ण राष्ट्राच्या किंवा राज्याच्या भावनांना व्यक्त करण्याचा मार्ग असतो. सामान्यपणे राष्ट्रीय दुखवटा केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून तर राज्यातील प्रशासकीय दुखवटा राज्याच्या गृह मंत्र्यालायकडून जाहीर केला जातो. स्वातंत्र्योत्तर काळात पहिला राष्ट्रीय दुखवटा महात्मा गांधींच्या हत्येनंतर जाहीर झाला होता. तर राज्य स्तरावर राज्यातील एखाद्या आजी-माजी मंत्र्यांचं निधन झालं तर प्रशासकीय दुखवटा जाहीर केला जातो. केवळ राजकारणच नाही तर इतर क्षेत्रातील थोर व्यक्तींच्या निधनानंतरही असे दुखवटे जाहीर केले जातात. उदाहरण सांगायचं झालं तर प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर किंवा माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला. मोठ्या व्यक्तीच्या निधनानंतर जो राष्ट्रीय दुखवटा जाहीर होतो तो सामान्यपणे सात दिवसांचा असतो. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 26 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 पर्यंत असा सात दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला. फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनानंतर तीन दिवसांचा प्रशासकीय दुखवटा जाहीर केला आहे. हा दुखवटा 28, 29 आणि 30 जानेवारीदरम्यान असणार आहे.
राष्ट्रीय किंवा प्रशासकीय दुखवट्याच्या काळात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जातो. मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या निधनानंतर प्रशासकीय दुखवटा जाहीर केल्यानंतर मंत्रालयासहीत सर्वच शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत. याला हाफ मास्ट असं म्हणतात. निधन झालेल्या व्यक्तीचे शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार केले जातात. यासंदर्भातील आदेशही जारी करण्यात आला असून अजित पवारांच्या पार्थिवावर गुरुवारी, 29 जानेवारी रोजी बारामतीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या