बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन निमित्त कार्यक्रम घेण्यात आला विशेष म्हणजे राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी 25 जानेवारी ला साजरा करण्यात येतो मात्र यावर्षी 25 जानेवारीला रविवार सुट्टी असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार 23 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने महात्मा फुले महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने " राष्ट्रीय मतदार दिनाच्या " कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती या दोन्ही कार्यक्रमाचं संयुक्तरित्या महाविद्यालयातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली त्यानंतर राष्ट्रीय मतदार दिन ही साजरा करण्यात आला यावेळी मतदार जनजागृती विषयी शपथ घेण्यात आली तसेच कोणत्याही निवड प्रक्रियेत स्वच्छ चरित्र्याच्या उच्च शिक्षित अशा उमेदवारांची निवड करून देशाला/राज्याला प्रगतीशील मार्गांवर आणणाऱ्या उमेदवारलाच निवडून द्यावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीची शपथ घेतली यावेळी राज्यशास्त्र विभागाचे प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. दिपक भगत, डॉ. रजत मंडल, (प्रभारी प्राचार्य), डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. स्वप्नील बोबडे, डॉ. सतिश कर्नासे, डॉ. विनय कवाडे, डॉ. पंकज कावरे, डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. विभावरी नखाते, यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या