नागपूर :- शासनाच्या शासकीय सुट्टया सोबतच प्रत्येक जिल्ह्याच्या क्षेत्रात जिल्हाधिकाऱ्याच्या अधिकारात काही सुट्टया असतात संबंधित जिल्हाधिकारी त्या जाहीर करतात नागपूर जिल्ह्याचा विचार करता नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी नागपूर जिल्ह्याकरिता 11 सप्टेंबर 2026 ला तान्हा पोळा, 18 सप्टेंबर 2026 ला महालक्ष्मी पूजन, 14 ऑक्टोबर 2026 ला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर झाली आहे. विदर्भातील नागपूर नंतर चंद्रपूर या ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताचा एकही थेंब न पाडता धर्मांतर केले. त्या क्षणापासून या दोन्ही ठिकाणाना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे मागील काही वर्षात चंद्रपूर जिल्ह्याकरिता 16 ऑक्टोबर धम्मचक्र अनुवर्तन दिनाची सुट्टी जाहीर केली जात होती. मागील वर्षाचा विचार करता सदर सुट्टी केवळ चंद्रपूर शहर पुरतीच जाहीर झाली आणि ती सुध्दा धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या अगदी काही दिवसांपूर्वीच त्यामुळं चंद्रपूरातील सामान्य नागरिकांत अशी चर्चा आहे की 16 ऑक्टोबर धम्मचक्र अनुवर्तन दिन हा चंद्रपूर जिल्ह्यातील मोठा समारंभ व त्याकरिता संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसह लगतच्या जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायी येत असतात त्यामुळं चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने यावर्षी स्थानिक सुट्टया जाहीर करतांना 16 ऑक्टोबर धम्मचक्र अनुवर्तन दिन ही सुट्टी संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याकरिता लागू करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या