बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारे संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभाग आणि मिलिटरी सायन्स विभागाच्या वतीने थलसेना दिवस 15 जानेवारी ला साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा करीता मुख्य मार्गदर्शक म्हणून कॅप्टन डॉ. महेशचंद शर्मा एन सी सी अधिकारी गुरुनानक विज्ञान महाविद्यालय बल्लारपूर, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. विनय कवाडे, अतिथी डॉ. पंकज कावरे आणि प्रा. ले. योगेश टेकाडे, एनसीसी विभाग प्रमुख म्हणून विचार मंचावर उपस्थिती होते. मुख्य मार्गदर्शक कॅप्टन डॉ. महेशचंद शर्मा यांनी एन सी सी कॅडेट्सला भारतीय सेना दिवसाचे महत्त्व आणि भारतीय सेना मध्ये भरती संदर्भात मार्गदर्शन केले तसेच देशप्रेमा विषयी जागृत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट प्रा. योगेश टेकाडे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनय कवाडे यांनी विद्यार्थ्यांना देशसेवा विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व एनसीसीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या