अजित पवारांचा चंद्रपूरातील 28 जुलै 2022 रोजीचा पूरग्रस्ताचा शेवटचा दौरा ठरला....! (Ajit Pawar's visit to Chandrapur on July 28, 2022, to meet flood victims, turned out to be his last such tour...!)

Vidyanshnewslive
By -
0
अजित पवारांचा चंद्रपूरातील 28 जुलै 2022 रोजीचा पूरग्रस्ताचा शेवटचा दौरा ठरला....! (Ajit Pawar's visit to Chandrapur on July 28, 2022, to meet flood victims, turned out to be his last such tour...!)

चंद्रपूर :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी सकाळी विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या आठवणी मात्र चंद्रपुरात अजूनही ताज्या आहेत. अजितदादांचा चंद्रपूर महानगरातील शेवटचा दौरा 28 जुलै 2022 रोजी झाला होता. तेव्हा चंद्रपुरात मोठा पूर येऊन गेला. तत्कालीन अर्थमंत्री म्हणून ते पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. पुराची समस्या नाल्याच्या अतिक्रमणामुळे होत असल्याचे त्यांच्या चाणाक्ष नजरेने हेरले. कशाचीच तमा न बाळगतात त्यांनी तेव्हा अतिक्रमणाबाबत कठोर भूमिका घेतली होती. तसेच ईरई नदीच्या खोलीकरणाच्या कामाची तत्काळ मंजूरीही दिली होती. एक स्पष्ट बोलणारा, तातडीने निर्णय घेणारा, कठोर पण जनतेविषयी तळमळ असलेला हा नेता होता. विरोधी पक्षातील लोकांनाही भावेल, असे त्यांचे व्यक्तीमत्त्व होते. त्यामुळे त्यांच्या या शहरातील आठवणी ताज्या आहेत. त्या नेहमी चर्चिल्या जातात. पुढेही लोक त्यांना विसरणार नाहीत. त्यांना पावन स्मृतींना भावपूर्ण श्रध्दांजली. 
           कोवीड परिस्थितीचा तो काळ होता. मॉस्क घालून स्वत: अजित पवार रहमत नगर वस्तीत फिरले. अतिक्रमित नाला व परिसरातील घरे बघितली. नंतर तेथील लोकांशी संवाद साधताना ते म्हणाले, ज्यांनी नाल्यावर घरे बांधली आणि नाला अडवला अशी काही घरे तोडावी लागेल. हा निर्णय कठोर असला तरी, तुमच्यामुळे परिसरातील 95 टक्के नागरिकांना त्रास होत आहे. परंतु, आम्ही तुम्हालाही वार्‍यावर सोडणार नाही. तर तुमच्यासाठी घरकुल योजना करू. कंत्राटदार नाल्यात मलबा टाकत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि मलबा हटवला पाहिजे. इरई नदीच्या खालीकरणाचे काम तातडीने हाती घ्या, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांना त्यांनी दिले होते. दादाजी खोब्रागडे यांच्या कार्याची घेतली दखल ज्यांनी एचएमटी धानाच्या वाणाचा शोध लावला आणि ज्यांची दखल 'फोर्ब्स' मॅगझिनने घेतली होती ते चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्याच्या नांदेड गावचे प्रगतीशील शेतकरी स्व. दादाजी खोब्रागडे यांची भेट घेण्यासाठी अजित पवार आले होते. दूरवर असलेल्या लहानश्यपा गावात जाऊन अजित पवार यांनी त्यांचा सत्कार केला. धानाच्या अधिक विकसित वाणाचे संशोधन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना 5 लाख रूपयांचा धनादेश आणि 5 एकर जमीनही त्यावेळी पवार यांनी त्यांना दिली होती. शेतकरी आणि शेती यांची जाण असलेला हा नेता होता.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)