चंद्रपूर -महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये एक मोठी खळबळ जनक बातमी समोर आलेली आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चंद्रपूर मनपा उमेदवाराची जी यादी या ठिकाणी पाठवलेली होती त्या यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्यामुळे व यादीतील उमेदवार वगळता इतर उमेदवारांना उमेदवारी वाटप करण्यात आल्यामुळे भाजपा प्रदेश कार्यालयाकडून हा निर्णय तडकाफडकी घेण्यात आला आहे. सुभाष कासानगोट्टुवार भाजपा जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यापासून त्यांच्यावर भाजपाचे सर्व पदाधिकारी यांनी सामान्य कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराज होते प्रदेश कार्यालयाने घेतलेल्या या तडकाफडकी निर्णय क्षेत्रफळात मोठ्या प्रमाणात स्वागत करताना दिसून येत आहे.
चंद्रपूर भाजपचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांना आज तडकाफडकी पदावरून काढून टाकण्यात आले. महापालिका निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेली यादी सुभाष कासनगोट्टुवार यांनी आपल्याच मताने बदलून टाकली. त्यांनी १० पेक्षा अधिक उमेदवार बदलून टाकले. प्रदेशाध्यक्षांचा हा अवमान असल्याने पक्षाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि आता त्यांना चंद्रपूर महानगर अध्यक्ष पदावरून तत्काळ प्रभावाने हटवण्यात आल्याचे पत्र जारी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या