चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चारित्र्य प्रमाणपत्र साठी पोलीस विभागाचा विशेष सेल सुरु (In view of the Chandrapur Municipal Corporation elections, a special cell has been started by the police department for character certificates.)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चारित्र्य प्रमाणपत्र साठी पोलीस विभागाचा विशेष सेल सुरु (In view of the Chandrapur Municipal Corporation elections, a special cell has been started by the police department for character certificates.)

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक निकालानंतर आता राज्यातील चंद्रपूरसह 29 महानगरपालिकांची निवडणूक येत्या महिन्याभरात पार पडणार आहे, निवडणुकीची रणधुमाळीला उद्या 23 नोव्हेंबर पासून सुरुवात होत असतांना मनपा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करायला लागणारे कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ करतो, मात्र या धावपळीत चारित्र्य प्रमाणपत्र तितकेच महत्वाचे. या प्रमाणपत्रासाठी उमेदवारांनी एकच गर्दी केली होती, उमेदवारांना चारित्र्य प्रमाणपत्रासाठी अर्ज व प्रमाणपत्र लवकर मिळावे यासाठी त्यांची समस्या लक्षात घेता चंद्रपूर पोलिस अधीक्षकांनी जिल्हा विशेष शाखा मध्ये चारित्र्य प्रमाणपत्र सेल ची स्थापना केली आहे. मनपा उमेदवारांना निवडणूक संबंधाने येणाऱ्या या अडचण बाबत सामाजिक समता संघर्ष समितीचे अध्यक्ष इरफान शेख यांनी दखल घेत पोलीस अधीक्षकांना उपाययोजना करण्या संबंधीचे निवेदन दिले होते. त्यांच्या मागणीवर सकारात्मकता दर्शवित पोलीस अधीक्षकांनी उमेदवारांना होणाऱ्या अडचणीवर सेल स्थापन केला आहे. या विभागाचा प्रभार पोलीस उपनिरीक्षक रोशन इरपाचे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मनपा उमेदवारांना चारित्र्य सत्यापन प्रमाणपत्र काढण्यासंबंधाने कुठलीही अडचण किंवा विलंब होत असल्यास पोउपनि रोशन इरपाचे मोबाईल क्रमांक ७७०९४४८२९८ वर संपर्क साधावा. ऑनलाईन अर्जासाठी उमेदवारांनी https://pcs.mahaonline.gov.in 
वर अर्ज करावा. असे आवाहन चंद्रपूर पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)