नागपूर जवळ बुटीबोरी मधील MIDC मध्ये अपघात, ३ जणांचा मृत्यू, अनेकजण मलब्याखाली अडकल्याची भिती (An accident occurred at the MIDC in Butibori near Nagpur, resulting in the death of 3 people, with fears that many others are trapped under the debris.)
नागपूर :- नागपूर जवळ बुटीबोरी मधील MIDC मध्ये मोठी दुर्घटना झाली. निर्माणाधीन टाकी कोसळल्यामुळे अनेकजण दबले गेलेत. या दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. ८ जण जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. टाकीच्या मलब्याखाली आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी ११ वाजता ही दुर्घटना घडली. पाण्याची टाकी कशी कोसळली? याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पोलीस अन् बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. नागपूरमधील बुट्टीबोरी एमआयडीसीमधील अवाडा कंपनीमध्ये निर्माणाधीन टाकी आज सकाळी ११ वाजता कोसळली. अनेकजण यावेळी काम करत होते, त्यावेळी अचानक टाकी कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जणांना बाहेर काढण्यात आलेय. त्यांच्यावर जवळच्या रूग्णलायात उपचार सुरू आहेत. टाकीच्या मलब्याखाली काही कामगार आणखी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून या ठिकाणी बचावकार्य वेगात केले जात आहे.
नागपूर ते चंद्रपूर महामार्गावरील बुट्टीबोरी येथील अवाडा ही सोलर पॅनल तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीमध्ये एक टाकी तयार करण्यात येत होती. याचे काम अंतिम टप्प्यात पोहचले होते. पण आज सकाळी ११ वाजता टाकी कोसळली अन् अनेकजण मलब्याखाली दबले गेले. दुर्घटनेचे व्हिडिओ अन् फोटो पाहून मृताची आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अवाडा कंपनीत दुर्घटना झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून दबलेल्या कामगारांसाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण मलब्याखाली अडकले आहेत. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, वॉटर प्रेशरमुळे टाकी कोसळल्याचे समोर आले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या