स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, अवैध दारू वाहतुक करतांना क्रेटा वाहनासह ८.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त (The local crime branch took action, seizing goods worth ₹8.12 lakh, including a Creta vehicle, while it was being used for illegal liquor transportation.)
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहरात पेट्रोलिंगवर असताना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला. पोलिसांना पाहताच वाहनचालकाने पळ काढला. मात्र तपासणी केली असता हुंडाई क्रेटा क्रं.एमएच ३३ ए ५०१३ या चारचाकी वाहनात मोठ्या प्रमाणावर विदेशी दारू आढळून आली. वाहनातून रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्कीचे ४५० नग (१८० मि.ली.) जप्त करण्यात आले असून, या दारूची किंमत १ लाख १२ हजार ५०० रुपये आहे. तसेच दारू वाहतुकीस वापरण्यात आलेल्या वाहनाची किंमत ७ लाख रुपये असून, एकूण मुद्देमाल ८ लाख १२ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावताना स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) चंद्रपूर शहरात कारवाई केली. रयतवारी कॉलरी येथील आशा किराणा दुकानाजवळ अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणारे वाहन पकडून ८ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई २३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास केली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भूरले, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावाऱ, इम्रान खान, पोअं शशांक बदामवर, किशोर वाकाटे यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या