मागील २ वर्षात १८ तासिका प्राध्यापकाचा तणावासह विविध कारणांनी मृत्यू : नेट-सेट सह उच्च शिक्षण घेऊन करायचे काय ? (In the last two years, eighteen part-time professors have died due to stress and other various reasons: What's the point of pursuing higher education with NET-SET qualifications?)
नागपूर :- राज्यात प्राध्यापक भरती आणि, बेरोजगार प्राध्यापकांच्या परिस्थितीबाबत विदारक परिस्थिती आहे. नेट-सेट, पीएचडी असे उच्च शिक्षण घेऊनही या प्राध्यापकांना तासिका तत्वावर अल्प मानधनात काम करावे लागते आणि ते मानधनही वेळेत मिळत नाही. अशा वैफल्यग्रस्त स्थितीतून त्यांच्यावर तणावाचे सावट वाढत आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या तणावामुळे मागील २ वर्षात १८ तासिका प्राध्यापकांचा हृदयघात किंवा विविध कारणांनी मृत्यु झाला. त्यापूर्वी काहींनी स्वतःच 'मृत्युला कवटाळल्याचे विदारक वास्तव तयार होत आहे. प्राध्यापक पदभरती महासंघाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०२४ साली राज्यात ८ तासिका प्राध्यापकांचा तणावामुळे बळी गेला. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील प्रा. विजय नवघरे व गोंदिया जिल्ह्यातील प्रा. व्ही.एम. गोंडाने यांचा समावेश आहे. महासंघाने २०२४ पूर्वीही १० मृत प्राध्यापकांची यादी सरकारला सादर केली होती. १.२० लाख वेतन द्या, भरतीसाठी आयोग नेमा राज्यात दरवर्षी १५ हजाराच्या आसपास उमेदवार नेट-सेट उत्तीर्ण होतात. राज्यात प्राध्यापकांच्या जवळपास २५ हजार जागा रिक्त आहेत. एका जागेवर पात्रतेनुसार दोन प्राध्यापकांची निर्धारित वेतनावर भरती करण्यात यावी. यामुळे अनुशेष भरून निघेल. या प्राध्यापकांना १.२० लाख रुपये निश्चित वेतन मिळावे. भरतीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करून प्राध्यापकांचे मॉनिटरिंग, वेतन व नियुक्ती एकाच पोर्टलवरून करण्यात यावी, अशी मागणी प्रा. डॉ. शिवराज पाटील यांनी केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या