राजुरा येथील सोन्डो गावाजवळ सोन्डो गावाजवळ भीषण अपघातात माय-लेकीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी (In a horrific accident near Sondo village in Rajura, four people, including a mother and daughter, tragically lost their lives, while five others were seriously injured.)

Vidyanshnewslive
By -
0
राजुरा येथील सोन्डो गावाजवळ सोन्डो गावाजवळ भीषण अपघातात माय-लेकीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी (In a horrific accident near Sondo village in Rajura, four people, including a mother and daughter, tragically lost their lives, while five others were seriously injured.)

राजुरा :- २५ डिसेंबरच्या मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास सोन्डो गावाजवळील नाल्याच्या पुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेग आणि निष्काळजीपणामुळे मारुती सुझुकी अर्टिगा क्रं. टीएस ०२ ईएन ५५४४ ही कार थेट पुलावरून नाल्यात कोसळली. या अपघातात कागजनगर जि. आसिफाबाद, तेलंगणा येथील सलमा बेगम (४५), त्यांची मुलगी अक्सा शबरीन (१२), नातेवाईक अफजल बेगम (६०) व साहीरा बेगम (४२) हे २४ डिसेंबर रोजी आजारी असलेल्या नातेवाईक यास्मीन बानो यांना नागपूर ला बघण्याकरिता गेले होते. सोबत नुसरत बेगम, नजहत बेगम, शाहीन निशा, सात वर्षीय अब्दुल अरमान आणि चालक अब्दुल रहमान हेही होते. विशेष म्हणजे नात्याची ओढ आणि आजारी व्यक्तीची भेट घेण्यासाठी निघालेला प्रवास अखेर मृत्यूच्या दाढेत गेला. नागपूरहून परत येत असताना राजुरा तालुक्यातील सोन्डो गावाजवळ कार नाल्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात माय-लेकीसह चार जणांचा दुर्दैवी अंत झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
          अपघाताचा आवाज होताच स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र राजुरा येथील शासकीय रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सलमा बेगम, अक्सा शबरीन, अफजल बेगम व साहीरा बेगम यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या नुसरत बेगम, नजहत बेगम, शाहीन निशा, अब्दुल अरमान व चालक अब्दुल रहमान यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी मृत सलमा बेगम यांचे पुत्र मोहम्मद अनास हुसैन यांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, चालकाच्या निष्काळजी वाहनचालना मुळेच हा भीषण अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पराग उल्लेवार करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)