हैदराबादमध्ये शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे संशोधन, त्याने तयार केलेली ‘सेन्सरयुक्त चप्पल जी महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठरेल उपयुक्त (A 17-year-old student studying in Hyderabad has developed a unique research, a 'sensor-equipped slipper' that will be useful for women's safety.)

Vidyanshnewslive
By -
0
हैदराबादमध्ये शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे संशोधन, त्याने तयार केलेली ‘सेन्सरयुक्त चप्पल जी महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठरेल उपयुक्त (A 17-year-old student studying in Hyderabad has developed a unique research, a 'sensor-equipped slipper' that will be useful for women's safety.)

वृत्तसेवा :- हैदराबादमध्ये शिकणाऱ्या अवघ्या 17 वर्षांचा विद्यार्थी सिद्धार्थ मंडला याने असा आगळावेगळा संशोधन केले  ज्याने महिलांच्या सुरक्षिततेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो. या संदर्भात विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार सिद्धार्थ मंडला यांनी तयार केलेली ‘सेन्सरयुक्त चप्पल’ ही एक अभिनव आणि कायदेशीर मान्यतांच्या चौकटीत बसणारी सुरक्षा संकल्पना आहे. या फुटवेअरमध्ये असा सेन्सर बसवलेला आहे की, एखादी व्यक्ती मुलीला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर चप्पल तत्काळ हलका विद्युत-झटका देऊन त्या व्यक्तीला रोखू शकते. तसेच हा झटका इतका नियंत्रित आहे की त्याचा उद्देश फक्त इशारा देणे आणि हानिकारक कृत्य थांबवणे आहे, गंभीर इजा करणे नाही—यामुळे या तंत्रज्ञानाची कायदेशीर शाश्वतता राखली जाते. या फुटवेअरची आणखी एक महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे मुलीला धोका जाणवताच ते तात्काळ पोलिसांना आणि पालकांना तिच्या लोकेशनची माहिती पाठवते. त्यामुळे केवळ बचावच नाही, तर मदत पोहोचण्याची प्रक्रिया देखील वेगवान होते. या चप्पलला वेगळ्या बॅटरीची गरज नाही; वापरणारी व्यक्ती चालते तेव्हा निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून ती स्वतः चार्ज होते. विचार करा ना कोणती मोठी कंपनी, ना करोडो रुपयांची लॅब… तरीही 17 वर्षांच्या सिद्धार्थने महिलांची सुरक्षितता वाढवण्यासाठी इतकं नाविन्यपूर्ण आणि जबाबदारीने आखलेलं साधन तयार केलं. अशा तरुण संशोधकांमुळे समाजात सकारात्मक बदल शक्य होतो, आणि महिलांच्या सुरक्षेसाठी नवे, कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित पर्याय उपलब्ध होतात. सिद्धार्थचे हे यश प्रेरणादायी असून नव्या पिढीच्या तांत्रिक क्षमतेचा उत्तम नमुना आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)