धक्कादायक ! कर्करोगाच्या आजाराला कंटाळून बल्लारपूर मध्ये एका व्यक्तीची आत्महत्या (Shocking ! A person committed suicide in Ballarpur due to cancer)
बल्लारपूर :- बल्लारपूर येथील कन्नमवार वॉर्ड परिसरातील दयाशंकर चंद्रिका सिंह ठाकूर (वय ५२) यांनी आज पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पहाटे सुमारास ५.२० वाजता त्यांची पत्नी झोपेतून जागी झाल्यानंतर ही घटना तिच्या लक्षात आली. तिने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या बल्लारपूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. दयाशंकर ठाकूर हे कर्करोगाने ग्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती मिळाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप आत्राम करीत असून मृत व्यक्तीच्या मागे आई-वडील, पत्नी, १४ वर्षांची मुलगी आणि १० वर्षांचा मुलगा असा आप्त परिवार आहे
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या