बल्लारपूर तहसील कार्यालयातील स्टील ट्रस छत व नाली बांधकामासाठी 58.86 लाखांची प्रशासकीय मान्यता, नागरिकांच्या सोयीसाठी तहसील कार्यालय परिसर होणार अधिक सुसज्ज (Administrative approval of Rs 58.86 lakhs for the construction of steel truss roof and drain in Ballarpur Tehsil Office, Tehsil Office premises will be more equipped for the convenience of citizens)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर - राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बल्लारपूर तहसील कार्यालय इमारत परिसरात स्टील ट्रस छत बसविणे आणि नाली बांधकाम करण्यासाठी 58 लाख 86 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. आमदार मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यांचे हे फलित आहे. ही मान्यता मिळणे म्हणजे बल्लारपूरच्या नागरिकांसाठी आणि प्रशासनासाठी एक मोठी सुविधा ठरणार आहे. पावसाळ्यातील अडचणी दूर करून कार्यालय परिसर अधिक सुसज्ज आणि लोकाभिमुख बनविण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
           ही कामे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2025-26 अंतर्गत “गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण” या लेखाशीर्षाखाली मंजूर करण्यात आली आहे. यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला पाठपुरावा फळाला आला आहे. या निर्णयामुळे तहसील कार्यालय परिसरातील सुविधा अधिक सक्षम होणार असून, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणींना आळा बसणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सुरू असलेला हा उपक्रम प्रशासनाच्या कार्यक्षमतेत भर घालणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या या निधीमुळे बल्लारपूर तहसील परिसर अधिक सुसज्ज आणि नागरिकाभिमुख होणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)