स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : ब्रम्हपुरीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसायावर छापा, तीन महिलांची सुटका (Local Crime Branch action: Raid on prostitution under the guise of spa center in Brahmapuri, three women rescued)
चंद्रपूर :- ब्रम्हपुरी शहरातील शेषनगर भागातील माय हेल्थ प्रो स्पा अँड वेलनेस सेंटर येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाला स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी मोठा शॉक दिला आहे. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीनंतर पथकाने छापा टाकून धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. कारवाईदरम्यान मिझोरम व नागालँड येथील तीन महिलांना अमानवीय अवस्थेतून मुक्त करण्यात आले. पोलिसांनी स्पा मॅनेजर करण गंगाधर मोहजनकर (वय २४) रा. पांजरेपार ता. नागभिड याला अटक केली असून स्पाचा मालक प्रीतीश बुर्ले हा फरार असून त्याचा शोध जोरात सुरू आहे.
या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात P.I.T.A. कायद्यानुसार कलम ३, ४, ५ व ७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी ठिकाणावरून रोख रक्कम, मोबाईल, नोंदवही, पावती बुक, स्कॅनर, कंडोम पाकिटे असा एकूण १८ हजार ६० रुपये किमतीचा साहित्य जप्त केला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, सहायक पोलीस निरीक्षक शितल खोब्रागडे, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा जंयत चुनारकर, नितेश महात्मे, छाया निकोडे, निराशा तितरे, अपर्णा मानकर, पोलीस अंमलदार प्रफुल्ल गारघाटे, प्रदिप मडावी, अजित शेन्डे, सुमित बरडे, दिनेश आराडे, समाजसेविका सरिता राजेद्रं मालु, माया सुनिल मेश्राम, हर्षा संदिप वानोडे यांनी केली. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी यांनी संयुक्तरित्या केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या