बल्लारपूर :- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा विचार करता राज्यभरात नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला असून नामांकन दाखल करण्याची मुदत काल दुपारी 3:00 वा संपन्न झाली तोपर्यंत चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करता 10 नगरपरिषद व 1 नगरपंचायत च्या नगराध्यक्ष पदासाठी 121 नामांकन दाखल झाली तर नगरसेवक साठी 1545 उमेदवारांनी नामांकन दाखल केले आज 18 नोव्हेंबर रोजी या नामांकन अर्जाची छाननी होऊन किती अर्ज बाद होतात याकडे लक्ष लागलेले आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून बल्लारपूर नगरपरिषद ओळखली जाते याठिकाणी 17 प्रभागातून 34 नगरसेवक व नगराध्यक्ष असे 35 लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे आहे एरवी लोकसभा विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीचे प्रस्थ वाढतंय अशी ओरड करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही घराणेशाहीच्या वाढत्या प्रस्थाला मूक संमती दिली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. बल्लारपूर नगर परिषद निवडणुकीचा विचार करता भारतीय जनता पार्टी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन्ही राजकीय पक्षानी एकाच कुटुंबातील 3 तर एका कुटुंबातील 2 उमेदवारांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली आहे. मात्र असे असतांना पक्षासाठी दिवस रात्र झटणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांची मात्र गोची होतांना दिसतेय कोणतीही निवडणूक म्हण्टलं की आर्थिक घटक महत्वाचा याचा विचार केला तरी सामान्य कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवू नये काय असा प्रश्न सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या