बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती च्या निमित्ताने महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) च्या संयुक्त विद्यमाने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलण करून झाली यावेळी रासेयोच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. पल्लवी जुनघरे, डॉ. बालमुकुंद कायरकर, तर सहकार्यक्रम अधिकारी डॉ. विनय कवाडे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. ले. योगेश टेकाडे यांची विचार पिठावर उपस्थिती होती. यावेळी मान्यवर अतिथीनी मनोगत व्यक्त केले. यानंतर महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी एनसीसी चे 60 कॅडट 1 एएनओ याची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या