चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 चे आयोजन रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्याचे नियोजित आहे. सदर परिक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचा कालावधी 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत होता. परंतु महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्याने परीक्षार्थी/उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अडचणींना सामोरे जावे लागल्याने, आता ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी 4 ते 9 ऑक्टोबर 2025 च्या मध्यरात्री 11.59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा शुल्क भरता न आल्यामुळे संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना नेट बँकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड द्वारे 9 ऑक्टोबरच्या रात्री 11.59 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही. संबंधित परीक्षार्थी/उमेदवारांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे कळविले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या