अल्पवयीन तरुणीवर अत्याचार प्रकरणात आरोपीस ३ वर्षांचा सश्रम कारावास (Accused sentenced to 3 years rigorous imprisonment in rape case against minor girl)

Vidyanshnewslive
By -
0
अल्पवयीन तरुणीवर अत्याचार प्रकरणात आरोपीस ३ वर्षांचा सश्रम कारावास (Accused sentenced to 3 years rigorous imprisonment in rape case against minor girl)

बल्लारपूर :- बल्लारपूर येथील आरोपी शिवा उर्फ शिवम श्रावण गोरघाटे (वय ३९) याने २५ जून २०१८ रोजी दुपारी आपल्या आजीसमवेत घरासमोर बसलेल्या १४ वर्षीय मुलीस इशारा करून बोलावले. ती न आल्याने आरोपीने तिच्याजवळ जाऊन जीव मारण्याची धमकी दिली व तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेले. तेथे त्याने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जीव मारण्याची धमकी देऊन अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी शिवा उर्फ शिवम श्रावण गोरघाटे यास जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत ३ वर्षांचा सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आणखी ३ महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हा निकाल ३ ऑक्टोबर रोजी देण्यात आला. विशेष म्हणजे पीडितेच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी त्याच दिवशी सायंकाळी ७.३० वाजता आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३५४, ३५४(अ) (१), ३४२, ३४७, ५०६(ब), ३६३ तसेच ‘पोस्को’ कायद्यातील कलम ८, ११(आई), १२ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप धोबे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. साक्षांच्या आधारे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश बिले यांनी आरोपी शिवा उर्फ शिवम गोरघाटे याला दोषी ठरवत ३ वर्षांचा सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. पीडितेच्या बाजूने सरकारी वकील महाजन यांनी युक्तिवाद केला तर कोर्ट पैरवी म्हणून मपोहवा अनिता मोहुर्ले होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)