बल्लारपूर :- दि .०३/१०/२०२५ रोजी, तालुका काँग्रेस कमेटीच्या शिष्टमंडळाने ओलादुष्काळा मुळे शेतीच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर ५०,००० रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी करणारे निवेदन नायब तहसीलदार अजय मलेलवार यांना सादर केले. निवेदनात म्हटले आहे की यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे बल्लारपूर तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तांदूळ, सोयाबीन, तूर, भाजीपाला आणि इतर पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. आणि शेतकऱ्यांना उपजीविकेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या नैसर्गिक आपत्तीला गांभीर्याने घेत,राज्य सरकारने पिकांच्या नुकसानीचे त्वरित मूल्यांकन करावे आणि प्रति हेक्टर किमान ५०,००० रुपये आर्थिक मदत जाहीर करावी. निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीचे सचिव घनश्याम मूलचंदानी, तालुकाध्यक्ष गोविंदा ऊपरे, शहराध्यक्ष देवेन्द्र आर्य, चेतन गेडाम, विनोद आत्राम, वासुदेव येरगुडे, अरुण पेंदोर, नरेश बुरांडे, शेखर अलाम, मंगेश थावरी आणि बंडू पाटिल वाढ़ई उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या