खनिज उत्खननातील ओव्हरबर्डनचा वापर रस्ते व विकासकामांसाठी व्हावा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी - आ. किशोर जोरगेवार (Overburden from mineral extraction should be used for roads and development works, demand from Revenue Minister Chandrashekhar Bawankule - MLA Kishore Jorgewar)

Vidyanshnewslive
By -
0
खनिज उत्खननातील ओव्हरबर्डनचा वापर रस्ते व विकासकामांसाठी व्हावा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी - आ. किशोर जोरगेवार (Overburden from mineral extraction should be used for roads and development works, demand from Revenue Minister Chandrashekhar Bawankule - MLA Kishore Jorgewar)


चंद्रपूर :- खनिज उत्खननादरम्यान निर्माण होणाऱ्या उपसा मातीचा (ओव्हरबर्डन) प्रभावी वापर करण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करून ओव्हरबर्डन डंपिंगचे अंतर ५ किलोमीटरवरून १० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात यावे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांची मुबंई मंत्रालयात भेट घेत केली आहे. राज्यात कोळसा, लोह, बॉक्साईट, मॅगनीज, चुनखडक आदी खनिजांचे उत्खनन प्रामुख्याने ओपन कास्ट पद्धतीने होत असून त्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर ओव्हरबर्डन बाहेर पडते. सध्याच्या धोरणानुसार, हे ओव्हरबर्डन केवळ ५ किमी परिघात डंप करण्याची मुभा आहे. त्यामुळे खाणी परिसरात प्रचंड प्रमाणात मातीचे ढिगारे साचतात, त्यामुळे रस्ते, नाले व स्थानिक मार्गांवर माती पसरते, नद्यांचे पात्र उथळ होतात आणि पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढत असल्याचे आमदार जोरगेवार यांनी निवेदनात नमूद केले आहे. ओव्हरबर्डनचा वापर शहर व गावातील खड्डेमय रस्ते बुजविणे, शेत पांदन रस्ते व इतर विकासकामांसाठी करता येणे शक्य आहे. या ओव्हरबर्डनचा वापर करून जलसाठे, सखल भूभाग यांचे भरण करून पूरनियंत्रणास मदत होईल. यामुळे संसाधनांचा पुनर्वापर करत पर्यावरण संरक्षण करता येईल असेही त्यांनी म्हटले आहे. खनिज उत्खनन करणार्या कंपन्यांनी ओव्हरबर्डन वाहतुकीची जबाबदारी स्वीकारून आवश्यक त्या ठिकाणी पोहोचवावे, अशी तरतूद धोरणात स्पष्टपणे नमूद करण्याचीही मागणी आमदार जोरगेवार यांनी यावेळी ना. चंद्रशेखर बावणकुळे यांना केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)