बल्लारपूर :- विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी महात्मा फुले महाविद्यालयात अनेक उपक्रम राबविले जातात मग राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शिस्तप्रिय विद्यार्थी घडवायचा असो की विविध स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून बौद्धिक विकास घडवायचा असो, की कमवा व शिका योजने अंतर्गत शिक्षण घेतांना आर्थिक मदत प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न असो अशाच प्रकारचा एक उपक्रम महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूरच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून करण्यात आला.
सद्यास्थितीत देशभरात नवरात्र उत्सवाचे भक्तिमय वातावरण असतांना विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक विभागाच्या वतीने काल 25 सप्टेंबर रोजी महाविद्यालयाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाग्यश्री लाभे, कुमुदिनी टेकाडे, प्रियंका नंदुरकर व अदिती गहेरवार मॅडम तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शुभांगी भेंडे मॅडम यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा फुले व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलन करून झाली. यानंतर समूह नृत्य व एकल नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. यानंतर दांडिया स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068



टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या