30 सप्टेंबर रोजी घुग्घुस येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन (Pandit Deendayal Upadhyay Women's Employment Fair organized at Ghugghus on September 30)
चंद्रपूर :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करिअर सेंटर आणि इंदिरा गांधी महिला महाविद्यालय, घुग्घुस यांच्या संयुक्त विद्यमाने 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता घुग्घुस येथील इंदिरा गांधी महिला महाविद्यालयात पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 10 वी, 12 वी, आयटीआय, पदविका, पदवी इत्यादी महिला उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील नामांकित उद्योजकांचा थेट नौकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. सदर रोजगार मेळाव्यातून 700 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला उमेदवारांनी सहभागी होण्याकरीता तसेच रोजगार मेळाव्यात सहभागी उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रिक्त पदे अधिसूचीत करावी. तसेच महिला उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात भाग घेण्याकरीता सदर पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त अ.ला. तडवी, यांनी केले आहे.
या नामांकित कंपन्यांचा सहभाग या मेळाव्यात 1. ओमॅट वेस्ट प्रा.लि. चंद्रपूर, 2. राघव फूड्स, प्रा. लि. चंद्रपूर, 3. मल्टी ऑरगॅनिक प्रा. लि. चंद्रपूर 4. वैभव इंटरप्रायझेस, नागपूर, 5. विदर्भ क्लिक वन सोल्युशन, चंद्रपूर, 6.. संसुर सृष्टी इंडिया प्रा.लि.चंद्रपुर 7.एस.बी.आय. लाईफ प्रा.लि. चंद्रपूर 8.एल. आय. सी ऑफ इंडिया, चंद्रपूर इत्यादी कंपन्याचे विविध रिक्त पदे असल्याचे नियोक्ते कडून कळविण्यात आलेले आहे. येथे करा संपर्क मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी तीन प्रती ) उपस्थित राहावे. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपुर दूरध्वनी क्रमांक 07172-252295 येथे संपर्क करावा.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या