बल्लारशाह वनपरिक्षेत्रात अमृत वृक्ष लागवड मोहीम यशस्वी (Amrit tree planting campaign in Ballarshah forest area successful)
बल्लारपूर :- हरित महाराष्ट्र-समृद्ध गहाराष्ट्र अभियानाच्या अमृतवृक्ष आपल्या दारी अंतर्गत १० कोटी वृक्षलागवडी अभियान मध्ये बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील बल्लारशाह, कारवा व इतर ठिकाणी विविध प्रजातींच्या ५,५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. सदर मोहीम उपवनसंरक्षक योगेश वाघाये मध्यचांदा, तसेच सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना व गावातील नागरिकांना वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनाबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे, बल्लारशाह यांनी मार्गदर्शन करत माहिती दिली आणि वृक्षपालनाचे महत्त्व सांगितले तसेच वन्यप्राणी ची माहिती दिले. सदर अभियान बल्लारशाह वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरूडे, वन परिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक, वनमजूर, चौकीदार, पीआरटी, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरीकांनी सक्रिय सहभाग घेत यशस्वी केले. यात शाळा व महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनीही उत्साहाने भाग घेतला. ज्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने मोठा टप्पा गाठला गेला आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या