महाबोधी महाविहार मुक्ती साठी बौद्धांनी एकत्र झाले पाहिजे.- भन्ते विनाचार्य (Buddhists should unite for liberation from Mahabodhi Mahavihara.- Venerable Vinacharya)

Vidyanshnewslive
By -
0
महाबोधी महाविहार मुक्ती साठी बौद्धांनी एकत्र झाले पाहिजे.- भन्ते विनाचार्य (Buddhists should unite for liberation from Mahabodhi Mahavihara.- Venerable Vinacharya)

भद्रावती :- महाबोधी महाविहार ही जागतीक धरोहार आहे. तिचे पवित्र्य आणि ओळख कायम ठेवायची असेल तर देशातील सर्व बौद्धांनी एकत्र झाले पाहिजे. असे आवाहन भन्ते विनाचार्य यांनी पंचशील बौध्द विहार भवन भद्रावती येथे पार पडलेल्या जनस़ंवाद कार्यक्रमात केले. अध्यक्षस्थानी बौध्द समन्वय संघ महाराष्ट्र राज्य चे समन्वयक नितीन गजभिये हे होते. मंचावर भन्ते संघरत्न, भन्ते रोहित, भन्ते शक्यपुत्र राहुल, भिक्खुनी सुबोधी, स्वागतध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे, बौध्द समन्वय संघ च्या समन्वयक स्मिता वाकडे, सिद्धार्थ सुमन गोपाल रायपूरे, राकेश धारगावे, मुनेश्वर गौरकार, कोमल रामटेके, संतोषभाई रामटेके, इत्यादी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले महाबोधी महाविहार ही भारताचीच नव्हे तर जागतिक धरोहार आहे. तिचे पावित्र्य आणि ओळख बदलण्याचे षडयंत्र सुरु आहे. महाबोधी महाविहार मुक्ती करिता दिल्ली जाम करायची आहे. त्याकरिता बौद्धांनी एकाजूट झाले पाहिजे. कार्यक्रमास बौध्द अनुयायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ सुमन, संचालन राजेंद्र पाटील आभार प्रदर्शन मुनेश्वर गौरकार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्या करिता प्रकाश धोंगडे, सुरेखा रामटेके, लता राजु देवगडे, टी. एस. फुलझले, लिनता जुनघरे,नंदा रामटेके, रंजना जवादे,दिपा चांदेकर, शेवंताबाई मेश्राम, अनुसया रायपूरे, प्रमिला देवगडे, सुवर्णा कोल्हटकर, कल्पना देवगडे, सुकेशनी शिंदे, फर्जना देव, लता बंडू देवगडे,जयश्री दुर्योधन, प्रणाली देवगडे, मीना वाळके, विक्ता रंगारी, रेखा रंगारी, अपर्णा दुर्योधन, सविता पेटकर, छाया कांबळे, सुषमा तामगाडगे, सपना कातकर, दर्शना पेटकर, वंदना अलोणे, छाया देवगडे, निर्मला वासनिक , छाया देवगडे, निर्मला वसानिक, करुणा गोटे, सोनी गेडाम, अनिल बांबोडे, भारत खोब्रागडे, सागर कांबळे, पुनीत नगराळे, भावना खोब्रागडे, सारिका पाथर्डे आणि पंचशील मंडल, आम्रपाली बोद्ध विहार, महाबोधी बुद्ध विहार, केसूर्ली महिला मंडळ, शिलभद्र मंडळं, सुमठाणा महिला मंडळ, इत्यादीनी सहकार्य केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)