राजकीय वादातून गेला " अम्मा की पढाई " या शिक्षण विषयक उपक्रमाचा बळी (The educational initiative "Amma Ki Padhai" fell victim to a political controversy)

Vidyanshnewslive
By -
0
राजकीय वादातून गेला " अम्मा की पढाई " या शिक्षण विषयक उपक्रमाचा बळी (The educational initiative "Amma Ki Padhai" fell victim to a political controversy)

चंद्रपूर :- आमदार किशोर जोरगेवार यांच्या आईच्या नावे अम्मा चौकाच्या नामकरणावरून चंद्रपुरात मोठा राजकीय वाद रंगला आहे. या वादाशी काही संबंध नसताना 'अम्मा की पढाई' या उपक्रमाला खेचण्यात आले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आमदाराच्या पुढाकाराने सुरू असलेला हा उपक्रम तात्पुरता बंद करण्यात आला आहे. दीक्षा भूमी संघर्ष समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करून आंबेडकर महाविद्यालयात सुरू असलेला हा उपक्रम बंद करण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. विशेष म्हणजे दीक्षा भूमी संघर्ष समितीने पुढे हा वाद थेट बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या नावाशी जोडला. जोरगेवार आपल्या आईच्या नावाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात 'अम्मा की पढाई' हा उपक्रम राबवतात. या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत असल्याचा आरोप केला. हा वाद वेगळ्या वळणावर जात असल्याचे बघून आमदार जोरगेवार यांनी हा शैक्षणिक उपक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या जागेचा शोध घेऊन तो सुरू करण्यात येईल, असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी जाहीर केले आहे. मात्र, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची खंत आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)