नागपूर(अजनी) ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस उद्या पासून सुरु होणार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 वंदेभारत एक्सप्रेसच ऑनलाईन उदघाटन करतील. (Nagpur (Ajni) to Pune Vande Bharat Express will start from tomorrow, Prime Minister Narendra Modi will inaugurate the 3rd Vande Bharat Express online.)

Vidyanshnewslive
By -
0
नागपूर(अजनी) ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस उद्या पासून सुरु होणार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 नव्या वंदेभारत एक्सप्रेसच ऑनलाईन उदघाटन करतील (Nagpur (Ajni) to Pune Vande Bharat Express will start from tomorrow, Prime Minister Narendra Modi will inaugurate the 3rd Vande Bharat Express online.)


नागपूर :- बहुप्रतीक्षित नागपूर (अजनी) ते पुणे आणि पुणे ते अजनी (नागपूर) अशी वंदे भारत एक्स्प्रेस रविवार, १० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुणे ते नागपूर दरम्यानचा प्रवास १२ तासांमध्ये होणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ तीन तासांनी कमी होईल. १० ऑगस्ट रोजी तीन वंदे भारतचे ऑनलाइन उद्घाटन करतील. त्यामध्ये नागपूर ते पुणे गाडीचाही समावेश आहे. ही गाडी रविवारी नागपूरहून सकाळी ९.५० वाजता पुण्याकडे मार्गस्थ होईल. ती रात्री नऊ वाजून ५० मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. सोमवारी सकाळी सहा वाजून २५ मिनिटांनी पुण्यातून नागपूरसाठी ही ‘वंदे भारत’ सुटेल. ती संध्याकाळी सहा वाजून २५ मिनिटांनी (अजनी) नागपूरला पोहोचेल. 

         आठवड्यातून सहा दिवस ही गाडी धावणार असून, नागपूरहून दर सोमवारी आणि पुण्यातून दर गुरुवारी ही गाडी रद्द असेल. पुण्याहून नागपूरला वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी गेल्या दीड वर्षापासून सुरू होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकत्याच एका बैठकीत ही गाडी सुरू करण्याची सूचना केली होती. त्यानुसार हा गाडी सुरू करण्यात येत आहे. दोन्ही शहरांदरम्यान प्रवासाचा वेळ कमी होणार असल्यामुळे या गाडीला चांगली पसंती मिळेल, अशी अपेक्षा आहे. सध्या पुण्यातून सोलापूर, कोल्हापूर आणि हुबळी या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. नागपूरची गाडी सुरू झाल्यानंतर त्यात आणखी भर पडणार आहे. पुणे ते नागपूर दरम्यान सुमारे ८९० किलोमीटरचे अंतर आहे. या मार्गावर स्लीपर गाडी मिळावी, अशी मागणी होती; परंतु सध्या चेअरकार सुरू होणार आहे. ठिकाणी असणार थांबे... दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, या ठिकाणी थांबे असणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)