विरांगणा राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण उपक्रमाचे चंद्रपूरमध्ये लोकार्पण (Inauguration of Virangana Rani Durgavati Women Empowerment Initiative in Chandrapur)

Vidyanshnewslive
By -
0
विरांगणा राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण उपक्रमाचे चंद्रपूरमध्ये लोकार्पण (Inauguration of Virangana Rani Durgavati Women Empowerment Initiative in Chandrapur)

चंद्रपूर :- आदिवासी महिलांना शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन व सामाजिक सक्षमता देऊन सर्वांगिण सक्षम बनविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या "राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना" उपक्रमाचा जिल्हास्तरीय लोकार्पण सोहळा आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे पार पडला. राज्यातील मुख्य लोकार्पण समारंभ नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्याचे थेट प्रक्षेपण चंद्रपूर कार्यक्रमात दाखविण्यात आले.
             जिल्हा कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आदिवासी महिलांनी मान्यवरांना राखी बांधून योजनेचे स्वागत केले. विविध शासकीय योजनांचे लाभ प्रदान करून ‘राखी पौर्णिमा’ साजरी करण्यात आली. हंसराज अहिर यांनी महिलांना केवळ शिक्षण नव्हे तर आर्थिक सक्षमता देणे आवश्यक असल्याचे सांगितले. आमदार श्री. जोरगेवार यांनी आदिवासी युवतींना जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी महिलांनी या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे सांगून राज्य शासन या योजनेच्या उद्देशपूर्तीसाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)