चंद्रपूर :- शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये महाविद्यालयीन पातळीवर मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी Mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रीशीपसाठी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज तात्काळ सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती व फ्रीशीप योजनेचे अर्ज ऑनलाईन भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना यासंदर्भातील सर्व सूचना लवकरात लवकर देऊन सूचना फलकावर देखील प्रदर्शित कराव्यात. विद्यार्थ्यांचे अर्ज व संलग्न कागदपत्रांची ऑफलाईन तपासणी करून त्यातील पात्र अर्ज प्रकल्प कार्यालयाच्या लॉगिनवर दिनांक 25 मार्च 2026 पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. शिष्यवृत्ती व फ्रीशीपसाठी केवळ परीपूर्ण व पात्र अर्जच ऑनलाईन पद्धतीने मंजुरीसाठी सादर करावेत. प्रकल्प अधिकारी श्री. राचेलवार यांनी स्पष्ट केले आहे की, मुदतीत अर्ज सादर न झाल्यास किंवा पोर्टल बंद झाल्यानंतर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या