बल्लारपूर तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत उद्या ८ जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता (Sarpanch of Ballarpur taluka likely to be announced tomorrow, July 8, leaving reservation)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत उद्या ८ जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता (Sarpanch of Ballarpur taluka likely to be announced tomorrow, July 8, leaving reservation)
बल्लारपूर :- जिल्हा निवडणूक विभागाने बल्लारपूर तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतींमध्ये २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीसाठी सरपंच पदांचे आरक्षण २३ एप्रिल २०२५ रोजी जाहीर केले होते. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी बल्लारपूर तहसीलमधील नवीन सरपंच पदांच्या आरक्षणासाठी ८ जुलै २०२५ या कालावधीत सोडत काढण्याचे तहसीलदारांना कळविले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ६ मे २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार व ग्रामविकास विभागाला थेट शासन निर्णय जाहीर केला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. बल्लारपूर तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायती आहेत. २३ एप्रिल २०२५ रोजी सरपंच पदासाठी अनुसूचित जाती (एस सी) प्रवर्गासाठी ३, अनुसूचित जमाती (एस टी) साठी ४, मागासवर्गीय (ओबीसी) साठी २ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८ आरक्षणे जाहीर करण्यात आली होती आता त्यात बदल करण्यात आला असून नवीन सरपंचपदासाठी अनुसूचित जातीसाठी ३, अनुसूचित जमातीसाठी ४, मागासवर्गीय (ओबीसी) ५ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५ आरक्षणे तयार केली जाणार आहेत. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने बल्लारपूर तहसीलदारांना ८ जुलै २०२५ रोजी सरपंच पदाचे आरक्षण काढण्याच्या सूचना दिल्या आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)