आईसोबत चहाच्या टपरीवर काम करणारा भरत थेट पोहोचला ISRO च्या चांद्रयानपर्यंत (Bharat, who works at a tea stall with his mother, directly reached ISRO's Chandrayaan)
वृत्तसेवा :- छत्तीसगडमधील छोटंसं गाव – चारौदा. बहुतेक लोकांना माहीतही नसेल असं हे गाव. इथं राहतो एक साधा, शांत आणि स्वप्नाळू मुलगा - भरत कुमार. वडील एका बँकेत सुरक्षा रक्षक, आई चहाची टपरी चालवते. आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची. पण या सगळ्यांतूनही भरतचं स्वप्न मात्र मोठं होतं – आयुष्य बदलवायचं. त्याने शिक्षण सुरू केलं केंद्रीय विद्यालय, चारौदा येथे. नववीत असताना फी भरणं शक्य नव्हतं, पण शाळेने त्याच्या गुणांवर विश्वास ठेवून ती माफ केली. भरतने हे संधीचं सोनं केलं. बारावी उत्तम मार्कांनी पास झाला आणि थेट IIT धनबादमध्ये दाखल झाला. पण तिथेही पैशाची अडचण कायम होती. या वेळी मदतीला धावून आले रायपूरचे उद्योजक अरुण बाघ आणि जिंदाल ग्रुप. भरतने त्यांचा विश्वास सार्थ ठरवत 98% गुणांसह गोल्ड मेडल पटकावलं. अभियांत्रिकीच्या सातव्या सेमिस्टरमध्येच भरतची ISRO मध्ये निवड झाली. आणि वयाच्या फक्त 23व्या वर्षी त्याला मिळाली भारताच्या ऐतिहासिक चंद्रयान 3 मोहिमेवर काम करण्याची संधी. छोट्या गावातून आलेला, चहाच्या टपरीवरून शाळेत पोहोचणारा तोच भरत आज देशाच्या अंतराळ मोहिमेत योगदान देतोय. भरत कुमार म्हणजे संघर्षातून यशाकडे नेणाऱ्या वाटेचा जिवंत झरा. तो फक्त एक विद्यार्थी नाही, तर हजारो छोट्या गावांतील मुलांसाठी प्रेरणा आहे. अशी मुलं नव्या भारताचं भविष्य घडवत आहेत - जिथं स्वप्नं फक्त पाहिली जात नाहीत, ती खरंच साकारली जातात.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या