बल्लारपूर - लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना आदर्श माणुन विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणारे डॉ.किशोर चौरे (इतिहास विभाग प्रमुख, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर जि. चंद्रपूर ) यांना राजश्री शाहूंच्या समतावादी नगरीतील नावाजलेल्या मानाचा व सन्मानाचा पुरस्कार मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दिक्षा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे 29 जून 2025 रोजी दुपारी 12:30 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, मिनी सभागृह कोल्हापूर येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. भरत रसाळे, प्रा. किसनराव कुराडे, डॉ.सोमनाथ कदम, मा.भरत लाटकर, डॉ. श्रीपाद देसाई, डॉ. शोभा चाळके, प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने, मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर यांच्या हस्ते राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार- 2025 देण्यात आला, या पुरस्कार अंतर्गत सन्मानचिन्ह, मानपत्र, शाहू महाराज यांची प्रतिमा व ग्रंथ ई पुरस्कार स्वरूपात मिळाले. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या