वृत्तसेवा :- अमेरिकेचे इतिहासकार व अभ्यासकांनी कनिष्क स्तूपाला जगातले आठवे आश्चर्य म्हणून घोषित करावे यासाठी युनेस्कोला मागणी केली आहे. कारण यांची उल्लेखनीय बांधकाम रचना, माणसाच्या परिश्रमाची सर्जनशीलता आणि ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वामुळे घोषणा करण्यास पात्र आहे. प्रसिद्ध प्रोफेसर अमजद हुसेन यांनी कनिष्क विहार या व्हिक्टोरिया हाॅल मध्ये एक प्राचीन पिंपळ वृक्ष व एक अद्भुत भिक्षापात्र या व्याख्यानात कनिष्क स्तूपाची धार्मिक महत्व व पाश्र्वभूमीबद्दल असे सांगितले की, "१९०९ उत्खनन करत जेव्हा स्तूपाच्या तळाशी पोहचले तेव्हा अमेरिकन पुरातत्वशास्त्रज्ञ आणि पेशावर म्युझियम पहिले क्युरेटर डी. बी. स्पूनर यांनी एक शोध लावला त्याने संपूर्ण पुरातत्व जगताला आश्चर्याचा धक्का बसला. या स्तूपाच्या तळाशी ब्राँन्झचे रक्षापात्रा मिळाले ज्यात बुध्दांचे हाडे व रक्षा मिळाल्या यावर खरोष्टी लिपी मध्ये असे लिहिले आहे. "हा पवित्र करंडक महाराज कनिष्क यांनी पुरूषपूर नगरच्या कल्याणासाठी अर्पण केला." हे रक्षापात्र पेशावर म्युझियम ठेवल आहे तर शरीर धातू ब्रिटिश सरकारने म्यानमार भेट दिले. हुएगसांगने या स्तूपांचे वर्णन असे केले आहे. हा स्तूप ४०० फूट उंच आहे. याला २५ तांब्याच्या खांबाने शोभित केले असून यावर सोन्याची कलाकुसर करण्यात आली आहे. याच नगरात तथागतांचे भिक्षापात्र देखील आहे. चित्र क्रमांक एक ब्राँन्झचे रक्षापात्र जे सध्या पेशावर म्युझियम पाकिस्तान मध्ये आहे. चित्र क्रमांक दोन ब्राँन्झच्या रक्षापात्रात सापडलेला बुध्दांचा शरीर धातू म्यानमार मधील मंडले शहरात उखांती हाॅल मध्ये सुरक्षित आहे. चित्र क्रमांक तीन कनिष्क स्तूप पेशावर पाकिस्तान.
संकलन :- अजय पवार, 7620111313
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या