बल्लारपूर पोलिसांची कारवाई, एका व्यक्तीला धारदार शस्त्रासह अटक पुढील तपास सुरु (Ballarpur police action, one person arrested with sharp weapon, further investigation underway)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर पोलिसांची कारवाई, एका व्यक्तीला धारदार शस्त्रासह अटक पुढील तपास सुरु (Ballarpur police action, one person arrested with sharp weapon, further investigation underway)


बल्लारपूर :- पोलीस स्टेशन, बल्लारपुर येथे दि. १६/०६/२०२५ रोजी पोलीस स्टाफ पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना मुखबिरद्वारे माहीती मिळाली की, निरज उर्फ लालु धनराज शेंडे, वय ३५ वर्ष रा. संतोषी माता वार्ड, बल्लारपुर हा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने आपले राहते घरी धारदार तलवार बाळगुन आहे. अशी खात्रीशिर माहीती मिळाल्यावरून सदर खबरेची शहानिशा करणे कामी दोन पंचांना घेवुन पोलीस स्टाफसह संतोषी माता वार्ड, बल्लारपुर येथील त्याचे घरी गेलो असता मुखबिरने सांगितलेल्या वर्णनाचा इसम त्याचे घरी मिळुन आला. इसम नामे निरज उर्फ लालु धनराज शेंडे याचे घराची झडती घेतली असता घरामध्ये एक लोखंडी धारदार तलवार मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा करून कायदेशिर कियारितीप्राणे तलवार जप्त करण्यात आली व आरोपी विरूध्द भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अन्व्ये कायदेशिर कार्यवाही करण्यात आली आहे. सदर ची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. मा. अपर पो. अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, श्री. उपविभागिय पो. अधिकारी, राजूरा पो. निरिक्षक श्याम गव्हाणे, यांचे मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी सपोनि राजेंद्र गायकवाड, स.पो.नि. मदन दिवटे, सफौ. आनंद परचाके, संतोष दंडेवार, संतोष पंडीत, सुनिल कामतकर, पुरूषोत्तम चिकाटे, सत्यवान कोटनाके पो. अंमलदार शरदचंद्र कारूष, विकास जुमनाके वशिष्ठ रंगारी, खंडेराव माने, मिलींद अत्राम, भास्कर चिंचवलकर, शेखर माथनकर, म.पो. अंमलदार अनिता नायडू, इत्यादी पो. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने कार्यवाही केली आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)