बल्लारपूर पोलिसांची धडक कारवाई, 2 विविध घटनेत 2 बंदूकसह 4 आरोपीना अटक पुढील तपास सुरु (Ballarpur police strike action, 4 accused arrested with 2 guns in 2 different incidents, further investigation started)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर पोलिसांची धडक कारवाई, 2 विविध घटनेत 2 बंदूकसह 4 आरोपीना अटक पुढील तपास सुरु (Ballarpur police strike action, 4 accused arrested with 2 guns in 2 different incidents, further investigation started)


बल्लारपुर : - दि.13/10/2024 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान बल्लारपुर पोलिसांना मिळालेल्या गुप्त खबरेवरून कश्मीरसिंग महेंद्रसिंग बावरी रा. बामणी ग्राम याचे राहते घरी कायदेशिर कियारितीप्रमाणे घरझडती घेतली असता एक जुने वापरते लोखंडी धातूचे देशी बनावटीसारखे सिंगल बॅरल व खाली मॅगझीन असलेले (अग्नीशस्त्र) 7 एम.एम.पिस्तूल किंमत 10,000/- रू.घटनास्थळ जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून पो स्टे ला अप क 958/2024 कलम 3, 25 भारतिय हत्यार प्रतिबंधक कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. 
 
       तसेच दि. 14/10/2024 रोजी रात्री 1 वाजे दरम्यान बल्लारपुर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारा वरून आकाश बाबूराव चाफले वय 24, प्रणय मारोती जुनघरे वय 23 वर्ष, दोन्ही रा. सुब्बई, ता. राजूरा आणि पलविंदरसिंग चॉदसिंग बावरी रा.कन्नमनगर वार्ड, बल्लारपुर यांना ताब्यात घेवून आकाश बाबूराव बाफले याचे ताब्यातून कायदेशिर कियारितीप्रमाणे एक जुने वापरते लोखंडी धातूचे देशी बनावटीसारखे सिंगल बोअर व खाली मॅगझीन असलेले (अग्नीशस्त्र) 7 एम.एम. पिस्तूल किंमत 25,000/- रू.घटनास्थळ जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून पो स्टे ला अप क्र.959/2024 कलम 7, 27 भारतिय हत्यार कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच सदर कार्यवाहीत एकुण चार आरोपींना ताब्यात घेवून अटक करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास सुरू आहे. सदर ची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन , अप्पर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु आणि दिपक साखरे उपविभागिय पोलिस अधिकारी राजूरा यांचे मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक सुनिल विठ्ठलराव गाडे यांचा नेतृवात सहायक पोलिस निरीक्षक अम्बादास टोपले, पोलिस उप निरीक्षक हुसेन, गजानन डोईफोडे व त्यांचे टीम ने केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)