चंद्रपूर आगारातून बस दुरुस्ती साठी गेलेला यांत्रिक कामगार बस खाली चिरडून मृत्यू, थोडीशी चूक जीवावर बेतली

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर आगारातून बस दुरुस्ती साठी गेलेला यांत्रिक कामगार बस खाली चिरडून मृत्यू, थोडीशी चूक जीवावर बेतली 

मूल :- नादुरूस्त बसच्या चाकासमोर दगड न लावल्याचे कारणावरून झालेल्या अपघातात एका यांञीकी कामगाराचा नाहक बळी गेल्याची घटना मूल बस स्थानकावर घडल्याने हळहळ व्यक्त केल्या जात आहे. गडचिरोली वरून चंद्रपूर कडे प्रवासी घेवुन जाणारी राज्य परीवहन महामंडळाची चंद्रपूर आगाराची प्रवासी बस (क्रं. एमएच १४ एचजी-८२४३) येथील बस स्थानकावरून चंद्रपूर कडे रवाना होण्यासाठी प्लँट फार्म वरून चालक रामचंद्र मेश्राम मागे घेत असताना प्रवेश व्दारावरील उतारावर अचानक ब्रेक नादुरूस्त झाले. प्रवासी बस समोर मागे करण्यास यांञीक दोष निर्माण झाल्याने नादुरूस्त बस मधील प्रवाश्यांना दुसऱ्या प्रवासी बसने चंद्रपूर कडे रवाना करून नादुरूस्त झालेल्या बसची तक्रार चंद्रपूर आगारात नोंदविण्यात आली. प्राप्त तक्रारीवरून नादुरूस्त बस दुरूस्त करण्यासाठी चंद्रपूर आगार येथुन राजु दांडेकर नामक यांञीकी कामगार मूल येथे आला. दुपारी १२.३० ते १ वा. चे दरम्यान नादुरूस्त बसची पाहणी करून अडकलेले ब्रेक दुरूस्त करण्यासाठी बस खाली झोपला. बस खाली झोपण्यापूर्वी संबंधित यांञीकी कामगार किंवा बस चालकाने बस मागे-पुढे जावुन अनुचित घटना घडू नये म्हणुन सुरक्षेचा उपाय म्हणुन नादुरूस्त बसच्या चाकासमोर दगड ठेवावयास पाहीजे होते. परंतु असे कोणतेही दगड किंवा अन्य साहीत्य चाकासमोर न ठेवता बस दुरूस्त करीत असतांना अडकलेले ब्रेक अचानक मोकळे झाल्याने उभी बस क्षणात समोर आली. त्यामूळे बस खाली झोपुन दुरूस्तीचे काम करणाऱ्या यांञीक कामगार राजु दांडेकर याचे अंगावरून बस गेल्याने तो गंभीर जखमी झाला. लागलीच उपस्थित एस.टी. कर्मचाऱ्यांनी जखमी राजु दांडेकर ह्याला येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून जखमी राजु दांडेकर ह्याला योग्य उपचारासाठी चंद्रपूरला हलवित असताना प्रवासा दरम्यान राजु दांडेकर याचा मृत्यु झाला. बस चालकाने चाकासमोर दगड ठेवले असते तर बस समोर आली नसती परीणामी यांञीकी कामगाराचा नाहक बळी गेला नसता, परंतु बस चालका कडून झालेल्या चुकीमूळे यांञीकी कामगारास जीव गमवावा लागल्याने बस चालक रामचंद्र मेश्राम विरूध्द भादंवी ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार सतिशसिंस राजपुत यांचे मार्गदर्शनात मूल पोलीस करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्यूज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)