कामगार किट न मिळाल्याने गोंधळ, चेंगराचेंगरीत अनेक महिला जखमी झाल्याचे वृत्त (There were reports that many women were injured in the stampede due to non-availability of labor kits)

Vidyanshnewslive
By -
0
कामगार किट न मिळाल्याने गोंधळ, चेंगराचेंगरीत अनेक महिला जखमी झाल्याचे वृत्त (There were reports that many women were injured in the stampede due to non-availability of labor kits)


बल्लारपूर :- कामगार कल्याण मंडळ मार्फत गवंडी, मजूर व इतर मजुरांना किट पेटी व डिनर सेट वाटपाचे काम सुरू झाले आहे. बल्लारपूर येथे काल ७ ऑक्टोबर रोजी नाट्यगृहात शेकडो लाभार्थ्यांना किट पेटी वाटप करण्यात आल्याची माहिती मिळताच आज संपूर्ण जिल्ह्यातील स्त्री-पुरुष लाभार्थी मोठ्या संख्येने नाट्यगृहाबाहेर जमले. काही नागरिक पहाटे ४ वाजता पासूनच पोहोचले परंतु गेट न उघडल्याने हजारो लोकांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गेट उघडले तेव्हाच रस्ता व वाहतूक सुरळीत झाला. यावेळी नाट्यगृहाच्या आवारात शिरण्यासाठी चेंगराचेंगरी झाली. विशेष म्हणजे याठिकाणी घुग्घुस, चंद्रपूर, विसापूर, मानोरा, मूल पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोठारी, कोरपना, गडचांदूर, राजुरा आदी भागातील हजारो महिला व पुरुष सकाळपासून रांगेत उभे होत्या मात्र महिलांसाठी पिण्याच्या पाण्याची, चहा, नाश्त्याची व्यवस्था नव्हती. जेवण न मिळाल्याने अनेक महिला बेहोश झाल्याची माहिती असून, यामुळे महिलांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेक महिला पडल्याने जखमी झाल्या. एका महिलेचा पाय मोडल्याची माहिती समोर येत आहे. चक्कर आल्याने सहा-सात महिला पडल्याचे वृत्त आहे. दुपारपर्यंत वाटपाची कोणतीही व्यवस्था नसल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी खाण्यापिण्या शिवाय घोषणाबाजी करत गोंधळ घातला. सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी कामगार कल्याण मंडळच्या अधिकाऱ्यांना बोलावून वितरणाबाबत घोषणा केली. त्यानुसार लाभार्थ्यांना त्यांच्या तहसीलमध्ये किट वितरणाची व्यवस्था करण्याबाबत माहिती देण्यात आली. असे असतानाही लाभार्थी पावसानंतर जायला तयार नव्हते. पोलिसांनीही हुसकवण्याचा प्रयत्न केला पण यश मिळू शकले नाही, सायंकाळी उशिरा पर्यंत महिला उभ्या होत्या आणि गोंधळ सुरूच होता. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी आपल्या टीम सोबत चोख बंदोबस्त ठेवला होता.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)