दुसऱ्या जिल्ह्यातील तोतये पत्रकार चंद्रपूर जिल्ह्यात सक़ीय ? (Is a journalist from another district a friend in Chandrapur district?)

Vidyanshnewslive
By -
0
दुसऱ्या जिल्ह्यातील तोतये पत्रकार चंद्रपूर जिल्ह्यात सक़ीय ? (Is a journalist from another district a friend in Chandrapur district?)

विश्लेषण :- प्रा. महेश पानसे, प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी  पत्रकार संघ मुंबई

चंद्रपूर/मूल – मुल तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यात सध्या तोतया पत्रकारांची धुम चर्चा सुरू आहे. सदर विषय काही जागरुक मंडळी यांच्यामुळे पोलिसांच्या नजरेत येऊन पोलीस ठाणे ऍक्शन मोडवर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. चर्चेनुसार पर जिल्ह्यातील काही तोतये चंद्रपूर शहरात ठाण मांडून पत्रकार असल्याची बतावणी करून व वेगवेगळे फंडे वापरून काही व्यावसायिकांना (जे अवैध धंदे सांभाळतात) ढोसण्या देत असल्याची व ही बोगस टिम संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकारितेला नासविण्याची योजना आखून कार्यशील झाल्याचे दाखले मिळू लागल्याचे बोलले जात आहे. बनावट कार्यक्रमांचे निमंत्रण पत्रिका छापून व्यापारी, अधिकारी यांचे कडून वसूलण्याचा प्रकार पोलिसांच्या तपासात समोर आला असल्याची सुद्धा  सुरू आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या  निमंत्रण पत्रका  वाटून सायकल वाटप, शालेय साहित्य वाटप यांसारखे आकर्षक उपक्रम राबविण्याचा फंडा वापरून अवैध धंद्यांशी संबंधित घटकांकडून जबरदस्तीने पैसे मागण्याचा प्रकार जनचर्चेतून उघड होत आहे. 
          भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील हे तोतये चंद्रपूर जिल्ह्यातील काही स्वयंघोषित पत्रकारांना व संघटनाना हाताशी धरून समाजात खऱ्या पत्रकारांना बदनाम करीत असल्याची शंका व्यक्त होऊ लागल्यास नवल नसावे. तालुक्यातील चर्चेनुसार अवैध धंदे करणाऱ्या एका व्यक्तीच्या माध्यमातून ही बनावट टोळी सक्रिय झाल्याची हवा असून समाजातील काही जागरूक नागरिकांनी या फसवणुकीची माहिती प्रशासनाला दिल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी त्वरित कारवाईचा मार्ग निवडला तर कौतुकच होणार आहे. मुल पोलिसांना या संबधाने छेडले असता काही संशयित निगराणी मध्ये असल्याचे कळते.  अद्याप कुणावरही या संबधाने गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. मात्र ऍक्शन मोडवर आलेले मूल पोलीस या बनावट तोतया पत्रकारांची लाल करून त्यांना आश्रय देणाऱ्या स्वयंघोषित पत्रकार व अवैध धंदे वाल्यांना धडा शिकवून खऱ्या पत्रकारांना न्याय देतील यात सुजान नागरीक व जेष्ठ पत्रकारांना शंका नाही. 
          पत्रकार समुदायातही जागरूकता वाढली मुल पोलिस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. तोतया पत्रकारांच्या या टोळीशी निगडित इतर लोकांबाबतही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बनावट निमंत्रण कार्डांचा वापर करून लोकांना फसवण्याचे प्रकार गंभीर स्वरूप धारण करत असल्याने पत्रकार समुदायानेदेखील याबाबत जागरूकतेचा संदेश दिला आहे. अनेक पत्रकारांनी अशा फसवणुकी विरोधात घोर कायदेशीर कारवाई होण्याची मागणी केली आहे. मुल तालुक्यातील नागरिक आणि सामाजिक संघटना या प्रकरणावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत असून, पुढील तपास आणि कारवाईबद्दल अपेक्षा व्यक्त केली जात आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)