"या आकाशचं काय?" गरीबांचा जीव खरंच इतका स्वस्त का असतो? "What about this Akash ?" Why are the lives of the poor really so cheap?
वृत्तसेवा :- "या आकाशचं काय?" कधीकधी एक प्रश्न मन पोखरत राहतो… गरीबांचा जीव इतका स्वस्त का असतो? हा मुलगा केवळ १४–१५ वर्षांचा होता. त्याचं नाव आकाश. त्याची आई हॉस्पिटलबाहेर चहाची टपरी चालवत होती. आकाश तिथे डब्बा द्यायला आला होता आणि सावलीत थोडावेळ झोपी गेला. पण दुर्दैव! एअर इंडियाच्या विमानाचे एक अवशेष त्या रस्त्यावर कोसळले. आगीच्या ज्वाळा त्याच्यापर्यंत पोहोचल्या… आणि आकाशने तिथेच शेवटचा श्वास घेतला. विशेष म्हणजे तो न विमानात होता, ना त्या होस्टेलमध्ये. तो रस्त्याच्या कडेला होता. त्याला वाचवायला धावलेली त्याची आई सुद्धा ५०% भाजली आहे आणि ती सध्या रुग्णालयात मृत्यूसोबत लढतेय. आता प्रश्न असा पडतो… या कुटुंबासाठी कोण पुढं येणार आहे? सरकार? Tata? ते एक कोटी देणार का? ज्यावेळी एखाद्याला 1 कोटी दिलं जातं, तेव्हा नाचत, टाळ्या वाजवत पोस्ट करणारे आता कुठे आहेत? कुठल्या चॅनेलवर आहे या आकाशची बातमी? नेत्यांचे सिनेमॅटिक शॉट्स दाखवले गेले, भगवद्गीता वाचण्याच्या बातम्या चर्चेत आल्या, पण आकाशसारख्या निर्दोष, गरीब बालकाच्या मृत्यूवर कोण बोलणार? एका आईचा संसार एका सावलीत संपला. या देशात एक सामान्य गरीब माणूस जर रस्त्यावर शांतपणे डोळे मिटून झोपी गेला, तर त्याचं भविष्य आकाशातुन येणाऱ्या ज्वाळांवर अवलंबून असतं का? हा केवळ अपघात नव्हे, हा एक सामाजिक प्रश्न आहे. गरीबाच्या जीवाला किंमत आहे का? की तो फक्त आकड्यांमध्ये हरवून जातो? आकाशसाठी आवाज उठवूया. त्याच्या आईसाठी न्याय मागूया. तिच्या अश्रूंना वाचा देऊया
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या