बल्लारपूर शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी देवेंद्र आर्य यांची नियुक्ती (Devendra Arya appointed as Ballarpur City Congress President)
बल्लारपूर :- महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशानव्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार चंद्रपूर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष व राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या स्वाक्षरीने बल्लारपूर नगर परिषदेचे माजी गटनेते देवेंद्र सत्यदेव आर्य यांना बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. या पूर्वी बल्लारपूर शहर अध्यक्ष अब्दुल करीम हे होते. देवेंद्र आर्य यांनी आपली या पदावर नियुक्ती झाल्यामुळे त्यांनी जिल्हाध्यक्ष सुभाष भाऊ धोटे, खासदार प्रतिभा ताई धानोरकर, माजी विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, चंद्रपूर जिल्हा प्रभारी आमदार अभिजित वंजारी, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, आणि माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांचे आभार मानले.
तसेच देवेंद्र आर्य यांच्या नियुक्ती वर माजी शहर अध्यक्ष अब्दुल करीम, तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे माजी, नगराध्यक्ष छाया ताई मडावी, चंद्रपूर जिल्हा परिवहन अध्यक्ष नरेश मुंदडा, बल्लारपूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष नरेश आनंद, भास्कर माकोडे, डॉ सुनील कुल्दीवार, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ अनिल वाढई इस्माईल ढाकवाला, प्रणेश अमराज, मेघा भाले, यांनी अभिनंदन केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या